'सारथी'ची बदनामी थांबवा : छत्रपती संभाजीराजेंची एकनाथ शिेंदेंकडे मागणी

सारथी संस्थेची आणि त्या माध्यमातून मराठा समाजाची होत असलेली बदनामी थांबवा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली. ''माझे पणजोबा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावावर ही संस्था आहे, तिची प्रतिष्ठा जपली गेलीच पाहिजे,'' अशी मागणी घेऊन मी एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले
Chatrapati Sambhajiraje Meets Ekanath Shinde for SARATHI
Chatrapati Sambhajiraje Meets Ekanath Shinde for SARATHI

पुणे : सारथी संस्थेची आणि त्या माध्यमातून मराठा समाजाची होत असलेली बदनामी थांबवा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली. ''माझे पणजोबा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावावर ही संस्था आहे, तिची प्रतिष्ठा जपली गेलीच पाहिजे,'' अशी मागणी घेऊन मी एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

या भेटीबाबत छत्रपती संभाजीराजे म्हणाले, "संस्थेत भ्रष्टाचार झाला असेल, तर ती रक्कम नेमकी किती?  प्रसार माध्यमांतून केवळ सारथी संस्थेलाच टार्गेट केलं जातं आहे. जर कुणी भ्रष्टाचार केलाच असेल, तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आमच्या दृष्टीने कुणी व्यक्ती महत्वाची नाही, तर मराठा समाजाच्या हिताची ही संस्था महत्वाची आहे. या संस्थेत जो काही घोटाळा झाला असेल त्याची CAG सारख्या नामांकित संस्थेकडून चौकशी करा. तो अहवाल सार्वजनिक करावा. पारदर्शकता असलीच पाहिजे. मंत्रिमंडळातील दोन जेष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत दोन्ही बाजूच्या लोकांना बोलावून सामोरा समोर चौकशी करून जनतेच्या मनातील शंका दूर करा, असे मी शिंदे यांना सांगितले''

''त्या चौकशीचे थेट वार्तांकन करा. ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांना चौकशी समिती ने बोलवून विचारपुस केली आहे का? की दुय्यम दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन तीत भ्रष्टाचार झाला असे जाहीर करण्यात येत आहे? आम्ही आंदोलन केलं, त्याठिकाणी आपण मुख्यमंत्री महोदयांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होता. माझ्याशी मुख्यमंत्री स्वतः बोलले. आपण आमच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले, त्यापैकी अंमलबजावणी कशा- कशाची  केली गेली?'' अशीही विचारणा मी केल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले

''या संदर्भात आज मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहणार असून, लवकरात लवकर सर्व त्या प्रक्रिया पूर्ण करून मुलांच्या भवितव्याची होत असलेली हेळसांड थांबवा. सरकारने यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी  विनंती करणार आहे.'' असेही छत्रपती संभाजी राजे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com