सामान्य नागरिकांनी फोन केला तरी मी निमंत्रण स्विकारतो : छत्रपती संभाजीराजे

छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य मावळ्यांना जीव लावला. त्यांना सांभाळले. त्यातून त्यांनी रयतेचे राज्य उभे केले. ते सर्वांचा आदर्श आहेत. त्यामुळेच कोणी मोठे नेते, पदाधिकारी निमंत्रण द्यायला आले तर त्यांनी शक्‍यतो माझी भेट घेतली पाहिजे हा माझा शिरस्ता आहे, असे छत्रपती संभाजी राजे यांनी आज येथे सांगितले
I Accept Common Peoples Phone Calls Say Chatrapati Sambhajiraje
I Accept Common Peoples Phone Calls Say Chatrapati Sambhajiraje

नाशिक : "कोणी आमदार, खासदार, नेत्यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले तर त्यांनी प्रत्यक्ष भेटावे, असा माझा शिरस्ता आहे. मात्र सामान्य जनता, कार्यकर्ते यांचे निमंत्रण फोनवरच स्विकारतो. त्यांच्या कार्यक्रमालाही आवर्जुन जातो. छत्रपती शाहू महाराज राज्यात जिथे जिथे गेले त्या सर्व ठिकाणी भेट देण्याचा माझा प्रयत्न आहे.'' असे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी येथे सांगीतले.

येथील लहवीत येथे शिव शक्ती मित्र मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या राजमुद्रेचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले, ''छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य मावळ्यांना जीव लावला. त्यांना सांभाळले. त्यातून त्यांनी रयतेचे राज्य उभे केले. ते सर्वांचा आदर्श आहेत. त्यामुळेच कोणी मोठे नेते, पदाधिकारी निमंत्रण द्यायला आले तर त्यांनी शक्‍यतो माझी भेट घेतली पाहिजे हा माझा शिरस्ता आहे. मात्र सामान्य शिवभक्त, कार्यकर्ते यांनी अगदी फोनवर निमंत्रण दिले तरी ते मी स्विकारतो. कारण या जनतेचे शिवाजी महाराजांवर प्रचंड प्रेम आहे,"

ते पुढे म्हणाले, ''तुम्ही सहलीला जाताय तर गोव्याला नका जाऊ. शिंदखेडराजा, रायगड, शिवनेरी येथे जा. तेथे तुम्हीला, तुमच्या कुटुंबाला प्रेरणा मिळेल असा इतिहास आहे. महाराष्ट्रात चारशेहून अधिक गडकिल्ले आहेत. त्यांच्या संवर्धनाचे काम मी सेवा म्हणून स्विकारले आहे. नवीन सरकारने जिल्हा नियोजन मंडळातील 5 ते 10 टक्के निधी किल्ले संवर्धनासाठी राखीव ठेवावा, तसेच गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वनपालाच्या धर्तीवर गडपालाची नेमणूक करावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.'' लवकरच त्याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्‍वास खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केला.

यावेळी मंडळाचे संस्थापक गजीराम मुठाळ, डॉ. लहवीतकर महाराज आदी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य विजय मेधने, अॅड. एन. जी. गायकवाड आदींना शिवछत्रपती समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com