chatisgadha cm election | Sarkarnama

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदासाठी भुपेश बाघेल यांचे नाव आघाडीवर ? 

वृत्तसंस्था
शनिवार, 15 डिसेंबर 2018

रायपूर : मध्यप्रदेश, राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडविल्यानंतर आता छत्तीसगडमध्ये चारजणांनी मुख्यमंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. भुपेश बाघेल, टी.एस.सिंगदेव, तमराद्वाज साहू आणि चरणदास महंत यापैकी कोणाला मुख्यमंत्री करायचे यासाठी आमदारांची मते जाणून घेत असली तरी भूपेश बाघेल यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.
 
कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल (शुक्रवारी) ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा केली त्यानंतर ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि या राज्याचे पक्षाचे प्रभारी पी.एल. पुनीया हे खास विमानाने छत्तीसगडमध्ये दाखल झाले. हे पक्षश्रेष्ठी आमदारांची मते जाणून घेत आहे.

चर्चेच्या तीन फेऱ्या पार पडल्यानंतरही अद्याप नाव निश्‍चित झाले नसले तरी हे नेते राहुल गांधीशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. तरीही बाघेल यांना मुख्यमंत्री करा असे बहुतांशी आमदारांचे म्हणणे असल्याचे समजते. येथील आमदारांचे मत काय आहे याची माहिती राहुल यांना दिल्यानंतर नवे मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख