channgdeo kamabale demmands bjp ticket in solapur | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

पंढरपुरात दोनवेळा झुंज दिलेल्या चांगदेव कांबळेंना हवीय सोलापूरची उमेदवारी!

संपत मोरे 
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

पुणे : 'ज्या काळात भाजपकडे निवडणूक लढायला उमेदवार नव्हता त्या काळात मी भाजपकडून लढलो, पक्षाच्या पडत्या काळात नेहमीच पक्षासोबत राहिलोय, त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मला सोलापूरमधून उमेदवारी मिळेल. माझ्यासमोर सुशीलकुमार शिंदे असोत कि अन्य कोणी माझा विजय नक्की आहे, "असा विश्वास भाजप नेते प्रा. चांगदेव कांबळे यांनी व्यक्त केला.

'भाजपकडून सोलापूर साठी अनेक नावांची चर्चा आहे मात्र महाराष्ट्रातील आणि मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी मला उमेदवारी दयावी अशीच मागणी केली आहे' असेही कांबळे म्हणाले. 

चांगदेव कांबळे प्राध्यापक आहेत. त्यांचं गाव माळशिरस तालुक्यातील तरंगफळ. १९९६, १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी केली होती. काँग्रेसचे त्यावेळचे खासदार संदीपान थोरात यांचा जनसंपर्क कमी आहे या मुद्द्यावर या दोन निवडणुका गाजल्या होत्या. यावेळी कांबळे यांनी अपुऱ्या साधनांच्या बळावर जोरदार लढत दिली होती. त्यावेळी पंढरपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेटवर्क नव्हते तरीही कांबळे यांनी दोन निवडणुका लढवल्या. 

कांबळे म्हणाले ,'मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तयार झालेला कार्यकर्ता आहे. १९८२ पासून मी संघात काम करतोय. मी  विचाराला बांधील असणारा सामान्य कार्यकर्ता आहे. दोन वेळा पक्षाने निवडणूक लढण्याचा आदेश दिला मी लढलो. कसलीही पर्वा केली नाही. मी ज्या पंढरपूर मतदारसंघातून लढलो त्या मतदारसंघातील पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा हे तालुके सोलापूर मतदारसंघात समाविष्ट झालेले आहेत. माझ्या पूर्वीच्या बांधणीचा मला फायदा होणार आहे. सोलापूर जिल्हयात भाजपला चांगले वातावरण आहे. या वातावरणात माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली तर समोर कोणीही उमेदवार असोत आमचा विजय नक्की होईल', असे कांबळे म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख