चांदवडच्या आघाडीने दिंडोरीत भारती पवार विजयी होणार : आमदार डॉ. राहुल आहेरांचा दावा

''दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शक्ती केंद्र प्रमुखांचे जाळे आणि विकासकामे यातुन भाजपचा प्रचार प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला होता. विशेषतः देवळा-चांदवड मतदारसंघात आम्ही सर्वाधिक आघाडी घेऊ. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या डॉ. भारती पवार हमखास विजयी होतील,'' असा दावा दिंडोरी मतदारसंघाचे प्रचारप्रमुख आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केला आहे.
चांदवडच्या आघाडीने दिंडोरीत भारती पवार विजयी होणार : आमदार डॉ. राहुल आहेरांचा दावा

नाशिक : ''दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शक्ती केंद्र प्रमुखांचे जाळे आणि विकासकामे यातुन भाजपचा प्रचार प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला होता. विशेषतः देवळा-चांदवड मतदारसंघात आम्ही सर्वाधिक आघाडी घेऊ. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या डॉ. भारती पवार हमखास विजयी होतील,'' असा दावा दिंडोरी मतदारसंघाचे प्रचारप्रमुख आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केला आहे. 

ते म्हणाले, ''गेले वर्षभर आम्ही अतिशय नियोजनबध्द पध्दतीने संपर्कावर भर दिला होता. सहाही विधानसभा मतदारसंघात 1881 मतदानकेंद्रावर बुथप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख कार्यरत होते. त्यांनी प्रत्येक गावात व समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचून केंद्र व राज्यातील भाजप सरकारने केलेली कामे, महत्वाचे निर्णय व राबविलेल्या योजनांची माहिती दिली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रत्येक मतदाराने विश्‍वास व्यक्त केला. पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या मोदी यांच्या सभेला एक लाखाहून अधिक नागरीकांनी गर्दी केली. त्याच दिवशी दिंडोरी मतदारसंघात आमच्या उमेदवाराच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले होते.'' 

आमदार आहेर पुढे म्हणाले, ''पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिंडोरी मतदारसंघाच्या प्रचारात खुप चांगले नियोजन केले व सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शिवसेना- भाजप युतीच्या नेत्यांत समन्वय होता. देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघाचे मी प्रतिनिधीत्व करतो. या मतदारसंघातील मतदारांनी सतत भाजपला पाठींबा दिलेला आहे. टंचाई व सततच्या दुष्काळाला सामोरे जात असलेल्या या मतदारसंघातील जवळपास प्रत्येक आम्ही जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट केले आहे. या गावांत सध्या मोठ्या प्रामणात श्रमदान व कामे सुरु आहेत. गेल्या पाच वर्षात जवळपास अडीच हजार कोटींचा निधी या मतदारसंघासाठी आम्ही आणला आहे. त्यात राज्य व केंद्रात भाजपचे सरकार असल्यानेच ते शक्‍य झाले. याची जाणीव मतदारसंघातील नागीरकांना आहे. त्यामुळे विरोधकांनी काहीही व कितीही प्रचार केला तरीही त्यांना मतदारांना अजिबात दाद दिलेली नाही. मी स्वतः या मतदारसंघातील प्रत्येक पंचायत समितीच्या गणात उमेदवारासह प्रचार केला आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त गावांत जाऊन आम्ही प्रचार केला.''

भाजपचे अनेक नेते त्यात सक्रीय होते. गेल्या तीन निवडणुकांत भाजप विजयी झाला आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेचा आहे. ही प्रतिष्ठा राखली जाईल. किमान तीस हजार मतांची आघाडी घेऊन भाजपच्या डॉ. भारती पवार विजयी होतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com