इतके वर्षे मी काय गोट्या खेळल्या काय? : चंद्रकांतदादा पाटील

इतके वर्षे मी काय गोट्या खेळल्या काय? : चंद्रकांतदादा पाटील

पुणे : "मी पुणे पदवीधर मतदारसंघातून आमदार झालेला असून इतके वर्षे मी या भागाचे प्रतिनिधित्व केलेय. त्यामुळे मी काय  गोट्या खेळल्या का, असा सवाल करत "मी  जसा काय बाहेर देशातून आलोय असा अपप्रचार विरोधक करत आहेत. या सर्व अपप्रचाराला बळी न पडता मला निवडून देऊन विकासाला साथ द्या, असे आवाहन पाटील यांनी केले.

बालेवाडी येथे झालेल्या सभेत पाटील यांनी जोरकसपणे मुद्दे मांडत विरोधकांवर टीका केली. वाढत्या संख्येने झालेल्या नागरीकरणामुळे पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर गरज भासते आहे. येत्या पाच वर्षांमध्ये शहरी आणि निमशहरी भागांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधांचे जाळे विकसित करण्यावर आमचा भर असेल असे चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूड मतदारसंघातील मताधिक्याचा विक्रम मोडतील आणि त्यांना बाणेर-बालेवाडी या प्रभागातून सर्वाधिक मते मिळतील, असा दावा भाजपने केला आहे. बालेवाडी येथे झालेल्या सभेत बाणेर-बालेवाडी हा परिसर मोठ्या ताकदीने चंद्रकांतदादांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे सांगण्यात आले.

या सभेला चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार मेधा कुलकर्णी, कोथरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष प्रकाश बालवडकर, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, राहुल कोकाटे आदी उपस्थित होते.

बाणेर-बालेवाडी हा भाग भाजपचा बालेकिल्ला झाला असल्याचे सांगत गेल्या काही वर्षांतील प्रत्येक निवडणुकीत भाजप उमेदवाराला येथे मोठे मताधिक्य मिळल्याचे अमोल बालवडकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना  शब्द दिल्याप्रमाणे पुणे शहरात सर्वाधिक मतदान ( ३८,०००) आमच्या भागातुन दिले. आता विधानसभेला सुद्धा चंद्रकांतदादांना ४५,००० पेक्षा जास्त मतदान देवुन शहरात पहिल्या क्रमांकाने भाजपला मतदान होईल.  

या वेळी बोलताना दानवे यांनी जोरदार बॅटिंग केली. 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाड मधून किंवा शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवलेली चालते परंतु चंद्रकांतदादांनी कोथरूड मधून निवडणूक लढविली तर  का चालत  नाही, असा सवाल त्यांनी केला. पाटील यांनी यापूर्वी पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे ते  बाहेरचे उमेदवार नाहीत. तर इथल्या स्थानिक प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. ते काही चिकमंगळूरहून निवडणूक लढवायला आलेले नाहीत' असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला.

दानवे म्हणाले "काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक देश चालवू शकत नाहीत म्हणून जनतेने भरघोस मतांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्यांच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्याने पक्ष नेस्तनाबूत होत आहे. काँग्रेसला तुम्ही- आम्ही संपवायची गरज नसून राहुल गांधी व सोनिया गांधीच संपवतील. प्रत्येक ठिकाणी भाषण लिहून नेणा-या सोनिया गांधी देश चालवू शकत नाहीत. तसेच काँग्रेसकडे सध्या देश चालवू शकेल असे  कोणतेच नेतृत्व नाही.त्याचप्रमाणे शरद पवारांनीही पातळी सोडून मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य केले असून जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल. भविष्यात देश चालवायचा असेल तर देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र असेच समीकरण असेल' याचा दानवेंनी पुनरूच्चार केला.

बापट  म्हणाले " पन्नास वर्षात झाली नाहीत ती कामे भाजप सरकारने पाच वर्षात केली आहेत.बाणेर बालेवाडीचा विकास करू हे आमचे आश्वासन असून चंद्रकांत पाटलांना भरघोस मतांनी निवडून द्या" 
तसेच आमदार मेधा कुलकर्णी यांनीही चंद्रकांत पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन नागरीकांना केले.

यावेळी माजी महापौर व काँग्रेसचे वरिष्ठ शहर उपाध्यक्ष दत्तात्रेय गायकवाड यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने व चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने भाजपात प्रवेश केला. तर मनसेचे संदीप जोरी, मनसेचे प्रचार प्रमुख विनोद जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com