बारामतीत कमळ जिंकण्यासाठी चंद्रकांतदादांची व्यूहरचना : तालुक्यात एक दिवस ठाण मांडणार

बारामतीत कमळ जिंकण्यासाठी चंद्रकांतदादांची व्यूहरचना : तालुक्यात एक दिवस ठाण मांडणार

माळेगाव : बारामती तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे यांचे मतांचे लिड कमी करायचे उद्दिष्ठ ठेवा आणि इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर आदी भागात भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा. विजय निश्चित आपलाच आहे, अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील भाजप कार्यकर्त्यांना प्रचाराची गुरूकिल्ली दिली. 

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचार प्रकियेला वेग देण्याच्या उद्देशाने आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

लोकसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वाधिक जागा युतीच्या निवडून येणार आहेत. अर्थात तसे पोषक वातावर निर्माण होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेली पाच वर्षे प्रचंड कष्ट घेतले आहेत. त्याचे प्रतिबिंब बारामती लोकसभा मतदारसंघातही उमटल्याचे दिसून येईल. त्यासाठी मी सात एप्रिल रोजी पूर्ण दिवस बारामती तालुक्यासाठी देणार आहे, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना बूथनिहाय कसे काम करायचे, मतदारांना कसे आपलेसे करायचे, याबाबत मार्गदर्शन केले. पाटील म्हणाले,``बारामती लोकसभा मतदार संघ जिंकण्यासाठीच यंदा कमळ चिन्ह मतदारांपुढे आणले आहे. मागील निवडणुकीत कमळ असते तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घरी बसावे लागले असते. याची जाणीव सर्वांनाच झाली असून भाजपचा उमेदवार यंदा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनो पंतप्रधान, मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी खंबरपणे उभे राहणार आहेत. गेली ७० वर्षात प्रथमच देवेंद्र फडणवीस यांच्सायारखा नम्र व हुशार मुख्यमंत्री जनतेने अनुभवला आहे.``

तत्पूर्वी, बारामतीसह प्रत्येक तालुक्यातून भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य मिळण्यासाठी असणाऱ्या आडचणी काही कार्यकर्त्यांनी श्री. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या. बारामतीमध्ये बूथनिहाय कामाचा आढावा दिलीप खैरे यांनी उपस्थितांपुढे मांडला. सुरेंद्र जेवरे यांनी बारामती शहरामध्ये भाजपचे काम तुलनेत कमी असून त्यासाठी सर्व जातीधर्मांतील लोकांच्या गाठीभेटी घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले. तसेच शहरात सत्ताधाऱ्यांविरुद्ध कार्यरत असलेल्या विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनाही विश्वासात घ्यावे लागेल, असे जवरे यांनी सुचविले.

द्राक्ष बागायतदारांच्या समस्या जाणून घेतल्यास शेतकऱ्यांचा मोठा पाटींबा भाजपला मिळेल, असे प्रशांत सातव यांनी बोलून दाखविले. मागील निवडणुकीत दौंडमध्ये भाजप विचाराच्या उमेदवाराला २८ हजार मतांचे लिड मिळाले होते. यंदा मात्र उमेदवारच दौंडचा असल्याने भाजपला लक्षवेधी लिड देण्याचा निर्धार दौंडकरांच्यावतीने वासूदेव काळे यांनी व्यक्त केला.

इंदापूरमध्ये ३२८ बुथ असून विशेषतः नाराज काॅंग्रेस कार्यकर्त्यांवर लक्ष केंद्रीत केल्यास येथे भाजपला चांगला फायदा होईल. त्यानुसार गाठीभेटी घेणे महत्वाचे आसल्याचे सांगण्यात आले. पुरंदरमध्ये ३५६, भोरमध्ये ५७५ बुथनिहाय काम चालू असल्याचे सांगण्यात आले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com