अखेर चंद्रकांतदादांच्या पाकिटावर प्रदेशाध्यक्ष कार्यालयाचा पत्ता! 

अखेर चंद्रकांतदादांच्या पाकिटावर प्रदेशाध्यक्ष कार्यालयाचा पत्ता! 

पुणे : ``मी पक्षाचा साधा कार्यकर्ता आहे. पक्ष सांगेल ते काम करण्यास मी तयार असतो. पक्षाने पाठविलेल्या पत्त्यावर मी जाण्यास तयार असतो, असे माध्‍यमांना सातत्याने सांगणाऱ्या चंद्रकांतदादांना नवा पत्ता मिळाला आहे. त्यांना प्रदेशाध्यक्ष कार्यलायाच्या पत्त्याचे पाकिट दिल्लीवरुन आज मिळाले. महसूल, बांधकाम अशी महत्त्वाची खाती मंत्रिमंडळात सांभाळणारे चंद्रकांतदादा आता आणखी पाॅवरफुल झाले आहेत. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष कि मंत्रीपदी वर्णी लागणार, याची चर्चा होती. त्यावेळी ते प्रदेशाध्यक्ष होतील याची दाट शक्यता होती. मात्र दिल्लीतुन सूत्रे हलली आणि पाटील यांना बांधकाम, सहकार आणि पणनमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली. यानंतर विविध टप्प्यांवर मंत्रीमंडळातील झालेल्या फेरबदलांमध्ये पाटील यांना महसूल आणि कृषी खातेही मिलाले.

काही टप्प्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी देखील त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. त्या प्रश्नांवर चंद्रकांत पाटील हे ठरलेली प्रतिक्रिया द्यायचे. ``मी पक्षाचा साधा कार्यकर्ता आहे. विद्यार्थी परिषदेमध्ये असताना देशाची भ्रमंती केली आहे. त्यामुळे पक्ष माझ्या नावाने जे पाकीट पाठवेल, त्या पाकिटावरील पत्त्यावर जाण्यास मी सदैव तयार असतो, असे ते सांगायचे.

आज मंगळवारी (ता.१६) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याचे पत्र पाठवित, प्रदेश कार्यालयाचा पत्ता पाकिटावर पाठविला आहे. 

पक्ष संघटनेत सातत्याने कार्यरत असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीला भाजपला सामोरे जाणार आहे. पाटील सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे आगामी तीन महिन्यांत महाराष्ट्र भाजपात मुख्यमंत्र्याखालोखाल दादांचाच शब्द चालणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com