विनय कोरेंचे युतीच्या बाजूने मन वळविण्यासाठी चंद्रकांतदादांनी घेतली भेट

विनय कोरेंचे युतीच्या बाजूने मन वळविण्यासाठी चंद्रकांतदादांनी घेतली भेट

कोल्हापूर :  जनसुराज्य पक्षाने भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला मदत करावी, यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे यांची महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज भेट घेतली.

पाटील यांची विनंती कोरे मान्य करणार की नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. कारण युतीच्या उमेदवाराचा लोकसभेसाठी प्रचार करणे हे त्यांच्यासाठी अवघड होऊ शकते.

चंद्रकांतदादाचा प्रभाव  असलेल्या कोल्हापूर, सांगली, हातकणंगले आणि सातारा या लोकसभा मतदारसंघांपैकी फक्त सांगली हाच मतदारसंघ भाजपाकडे आहे. तरी चारही मतदारसंघातील विजयासाठी दादांनी हालचाली सुरू केल्या आहेत. हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. विनय कोरे यांनी येथे विद्यमान खासदार राजू शेट्टींच्या विरोधात मानेंना मदत करावी, यासाठी या भेटीत बोलणे झाले असल्याची चर्चा आहे. दीड तास या दोन्ही नेत्यांनी बंद खोलीत चर्चा झाली.

कोरे यांची हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ताकद आहे. ते काही वर्षांपासून भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांचा शाहूवाडी- पन्हाळा हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्याठिकाणी सेनेचे सत्यजित पाटील सरूडकर आमदार आहेत. त्यामुळे विधासभेला सेना हा मतदारसंघ कोरेंसाठी सोडणे शक्य नसल्याने ते लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करतील का, हा प्रश्नच आहे.  गेल्या निवडणुकीतही त्यांनी काॅंग्रेसचे उमेदवार कल्लप्पा आवाडे यांचा प्रचार केला होता. या निवडणुकीत ते काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com