चंद्रकात पाटीलही रमले गप्पांच्या पुणेरी कट्ट्यावर!

चंद्रकात पाटीलही रमले गप्पांच्या पुणेरी कट्ट्यावर!

पुणे : गप्पांचा फड जमविण्यात पुणेकरांचा हात कोणी धरणार नाही. अशा गप्पांच्या फडांचे अनेक कट्टे शहरात प्रसिद्ध आहेत. राजकीय व इतर मतभेद विसरून सर्वच थरांतील मंडळी अशा कट्ट्यांमध्ये सहभागी होत असतात. मूळचे कोल्हापूरचे पण आता पुण्याचे पालकमंत्री झालेले चंद्रकांत पाटील यांनीही पुणेरी कट्ट्यात अल्पसा सहभाग घेऊन पुणेकरांची शैली आत्मसात करण्यास सुरवात केली आहे.

रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या अशा कट्ट्यांत पुण्यात अनेक राजकीय नेते सहभागी होत असतात. खासदार गिरीश बापट, काॅंग्रेसचे नेते उल्हास पवार हे अशा कट्ट्यांतील जुनेजाणते नेते.

टिळक रस्त्यावरील गिरीजा कट्ट्यावर बापट आठवड्यातून एकदा तरी फेरी मारणारच. त्यांनीच पालकमंत्र्यांना रविवारी रात्री गिरीजा कट्ट्याची सफर घडविली. या वेळी त्यांच्यासोबत आमदार व पुणे भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ या देखील उपस्थित होत्या.

पाटील यांनी काल रात्री पुण्यातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी दिल्या. त्यानंतर रात्री उशिरा गिरीजा कट्ट्यावर आले. भाऊ सणस यांनी त्यांचे स्वागत केले. पाटील हे तेथे अचानक आल्याने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. उपस्थित पत्रकारांनी त्यांना राजकीय प्रश्नांवर बोलते करण्याचा प्रयत्न केला. त्यालाही त्यांनी उत्तरे दिली. सोमवारी सकाळी मुंबईला जायचे असल्याने पाटील यांनी सविस्तर गप्पांसाठी परत येण्याचे आश्वासन देत कट्ट्यावरून निरोप घेतला.     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com