Chandrkant Jadhav wants to develope Kolhapur as role model for nation | Sarkarnama

कोल्हापूरला देशातील विकासाचे  मॉडेल बनवू : चंद्रकांत जाधव 

- लुमाकांत नलवडे 
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

कोल्हापूरला देशातील विकासाचे मॉडेल बनविण्याचे माझे व्हिजन आहे. स्पोर्टस्‌, उद्योग-व्यापार, मनोरंजन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मी काम करीत आहेत. त्याचा फायदा कोल्हापूरच्या विकासासाठी करण्याचे माझे ध्येय आहे. पर्यटन विकासातून रोजगार निर्माण करणे, आयटी हब तयार करून तरुणांना रोजगाराची संधी देणे.

कोल्हापूरला देशातील विकासाचे मॉडेल बनविण्याचे माझे व्हिजन आहे. स्पोर्टस्‌, उद्योग-व्यापार, मनोरंजन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मी काम करीत आहेत. त्याचा फायदा कोल्हापूरच्या विकासासाठी करण्याचे माझे ध्येय आहे. पर्यटन विकासातून रोजगार निर्माण करणे, आयटी हब तयार करून तरुणांना रोजगाराची संधी देणे.

महिलांच्या हाताला काम देण्याचा विकास आराखडा माझ्याकडे आहे. दहा वर्षांत कोल्हापूरचा विकास झाला नाही, हे मतदारांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे लोकांचा प्रतिनिधी म्हणून मतदार मला विजयी करतील, असा विश्‍वास कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस- स्वाभिमानी आघाडीचे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला. 

* जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन जात आहात? 
- कोल्हापूरचा विकास हा माझा अजेंडा आहे. दहा वर्षांत पर्यटन, आयटी हब, स्पोर्टस्‌, व्यापार-उद्योग अशा अनेक क्षेत्रात भरीव कामाची अपेक्षा होती. मात्र, असे घडले नाही आणि नेमके हेच करण्यासाठी मी रिंगणात आहे. आजपर्यंत स्पोर्टस्‌, उद्योग, समाजकारण अशा विविध माध्यमातून जनतेत राहिलो आहे. त्यांचे प्रश्न मी जवळून पाहिले आहेत. त्यांना शाश्वत विकास हवा आहे आणि तोच देण्याचा माझा प्रयत्न आहे. कोल्हापुरातील स्पोर्टस्‌चे टॅलेंट जगभर पोचविण्याचा माझा आजपर्यंत प्रयत्न राहिला आहे. येथून पुढेही त्याला प्राधान्य असणार आहे. 

*कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा फायदा होईल का? 
-
मी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने, सामाजिक कामाच्या माध्यमातून जनतेत राहिलो आहे. आज कॉंग्रेस पक्षाकडून मिळालेली उमेदवारी ही लोकांच्या डेव्हलपमेंटसाठीच आहे. पक्ष म्हणून एक ताकद असते. त्याचा मला नक्कीच उपयोग होत आहे. याचबरोबर सर्व घटकातील जनतेशी माझा संपर्क आहे. त्याचाही फायदा नक्कीच होईल. व्यापारी, उद्योग, व्यावसायिक, स्पोर्टस्‌ अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींकडूनही मला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. 

* प्रतिस्पर्ध्यांच्या विकासासंदर्भात काय सांगाल? 
-
लोकप्रतिनिधी हा लोकांसाठी असतो. लोकांनी दिलेल्या करातून विकासकामांना निधी येतो. त्यामध्ये भ्रष्टाचार होत असेल तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. पर्यटन विकासाचे मॉडेल तयार होणे अपेक्षित होते; मात्र तसे काहीच घडले नाही. माझ्याकडे व्हिजन आहे. स्पोर्टस्‌, आयटी, पर्यटन याबाबत विकास न झाल्यामुळे मतदार विरोधकांना त्यांची जागा दाखवेल, असा विश्‍वास आहे. मतदार संधी देऊन पाहतो. कामे झाली नाही तर त्याला त्यांची जागा दाखवितो. आता विरोधकांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. ही वेळ मतदार नक्कीच साधतील, असा विश्‍वास आहे. 

* तुम्हाला निवडून का द्यावे? 
-
कोल्हापूर उत्तरमध्ये काहीच विकास झालेला नाही. कोणतेही व्हिजन नाही. लोकांना अपेक्षित विकास करण्याचे व्हिजन माझ्याकडे आहे. कोल्हापूरमध्ये स्पोर्टस्‌चे टॅलेंट आहे. त्याला जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचे माझे व्हिजन आहे. पर्यटन विकासातून बेरोजगारी कमी करण्याचं प्रयत्न मी करणार आहे. कलाकारांची दुनिया काय आहे हे मी स्वतः एक चित्रपट काढून पाहिले आहे. कलाकारांच्या उन्नतीसाठी मी प्रयत्न करणार आहे. कोल्हापूर डेव्हलपमेंट माझे ध्येय आहे. देशात कोल्हापूरचे नाव निघेल अशी डेव्हलपमेंट करू हा माझा विश्वास जनतेसमोर व्यक्त करीत आहे. 

* विजयाची खात्री आहे काय? कारण? 
-
स्पोर्टस्‌, उद्योग, मनोरंजन, व्यापार अशा वेगवेगळ्या सेक्‍टरमधील माहिती मला आहे. याचे विकासात परिवर्तन करण्यासाठी मतदार मला निवडून देतील याची मला खात्री आहे. आजपर्यंत केलेल्या समाजकरणानंतर मी राजकारणात आलो आहे. मतदार मला मतदान करतील. आजपर्यंत केलेल्या कामाची पोचपावती मतदार मला विजयी करून देतील, असा विश्वास आहे. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारांपर्यंत पोचण्यासाठी माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत जाण्याचा माझा प्रयत्न आहे. आजपर्यंत जनतेत राहिलो आहे. मतदारांनी मला समजून घेऊन मतदान करावे व मला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी, हे माझे या मुलाखतीतून आवाहन आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख