चंद्रशेखर बावनकुळे यांचा कोराडीत कस लागणार...

...
cahandrashekhar bawnkule
cahandrashekhar bawnkule

कामठी : काराडी सर्कलमध्ये मागील निवडणुकीत झालेल्या परभवाचा भाजप वचपा काढणार की कॉंग्रेस गड राखणार याकडे लक्ष लागले आहे. यातच भाजपचे बंडखोर मोरेश्‍वर (बंडू) कापसे यांनी रिंगणात ताल ठोकल्याने ते कुणाच्या मूळावर उठणार हे निकालनंतरच स्पष्ट होईल.

माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे गृहक्षेत्र असलेल्या कोराडी सर्कलमध्ये कॉंग्रेसचे नाना कंभाले यांचा मागील निवडणुकीत विजय मिळविला होता. कोराडी सर्कलमध्ये भाजपला अद्याप खोलवर मुळे रुजवता आली नाहीत हे जरी सत्य असले तरी बावनकुळे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. बावनकुळे यांच्या विकासाच्या झंजावात भाजपला किती फायदा मिळवून देणारे हे पाहणे औसुक्‍याचे ठरणार आहे.

कोराडी सर्कमलध्ये लढत तशी थेट दिसत असली तरी ती बहुरंगी आहे. कॉंग्रेसचे ज्ञानेश्‍वर (नाना) कंभाले, भाजपचे संजय मैद, वंचितचे राजहंस मारबते, एमआयएमचे जाहीद खान व अपक्ष मोरेश्‍वर कापसे यांच्यात ही लढत रंगणार आहे.

भाजपसमोर वंचितचे मारबते व कापसे यांचे आव्हाण आहे. मारबते मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष असल्याने त्यांचा फायदा मिळू शकतो तर भाजपमधून कापसे यांनी बंडखोरी केली आहे. कॉंग्रेससमोर एमआयएमचे जाहीद खान यांचे आव्हाण आहे.

पंचायत समितीमध्येही टशन
कोराडी पंचायत समितीमध्ये भाजपच्या सविता जिचकर व कॉंग्रेसच्या अर्चना बोंडे यांच्यात थेट लढत आहे. कवठा पंचायत समितीमध्ये भाजपच्या स्नेहा मेश्राम, कॉंग्रेसच्या दिशा चनकापुरे, वंचितच्या सारिका मानकर, अपक्ष प्रीती झाडेकर यांच्यात सामना रंगणार आहे. सर्वत्र प्रचाराचा धुळडा उडू लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com