Chandrashekhar Bawankule on Butibori success | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

बुटीबोरीचे यश म्हणजे विकास कामांची पावती  ऊर्जामंत्री बावनकुळे

सरकारनामा
मंगळवार, 25 जून 2019

..

नागपूर : युती सरकारने पुढाकार घेऊन बुटीबोरी नगर परीषदेची निर्मिती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. 

हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी बुटीबोरीच्या विकासावर लक्ष देऊन विशेष भर दिला. स्थानिक कार्यकर्त्यांनी ती कामे जनमानसांपर्यंत पोचविली.

त्यामुळे बुटीबोरीत भाजप-सेना युतीचा विजय हा सरकारने केलेल्या विकास कामांची पावती आहे, असे शहरालगतच्या नगर परीषदेवर भाजपचा झेंडा फडकल्यावर जिल्ह्याचे  पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख