महाराष्ट्राच्या भल्यासाठी अजित पवारांनी योग्य निर्णय घेतला - चंद्रशेखर बावनकुळे

गेल्या महीन्याभरातील अनेक नाट्यमय घडामोडींनंतर आज सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस आणि पवार हे दोघेही टॉपचे बॅट्‌समन आहेत. त्यामुळे आता येत्या पाच वर्षात महाराष्ट्र देशातच नव्हे तर जगात क्रमांक एकचे राज्य होईल. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी योग्य निर्णय घेतला असल्याचे राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्राच्या भल्यासाठी अजित पवारांनी योग्य निर्णय घेतला - चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर ः गेल्या महीन्याभरातील अनेक नाट्यमय घडामोडींनंतर आज सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस आणि पवार हे दोघेही टॉपचे बॅट्‌समन आहेत. त्यामुळे आता येत्या पाच वर्षात महाराष्ट्र देशातच नव्हे तर जगात क्रमांक एकचे राज्य होईल. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी योग्य निर्णय घेतला असल्याचे राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

श्री बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय नेते अमित शहा आणि नितीन गडकरींनी फार महत्वाच्या घडामोडी घडवून आणल्या. त्याचा फायदा लवकरच महाराष्ट्राची जनता बघेल. अजित पवार ऊर्जामंत्री असताना मी विरोधी पक्षाचा आमदार होतो. तेव्हा मी त्यांच्या कामाचा धडाका पाहीला आहे. ते मोठे नेते आहेतच पण सोबत धडाडीचे कार्यकर्तेदेखील आहेत. त्यांच्या या निर्णयाने महाराष्ट्रात विकासाच नवीन पर्व सुरु झाल आहे. तसेही तीन पक्षांचे सरकार जास्त काळ चालले नसते. त्यामुळे राज्याचे नुकसानच होणार होते. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत. ते अमलात येण्यासाठी पुन्हा त्यांचेच सरकार येणे गरजेचे होते, ते आले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com