Chandrasekharji, your work is going well. | Sarkarnama

चंद्रशेखरजी, आपका काम बहुत अच्छा चल रहा है

विलास कुलकर्णी
शनिवार, 25 एप्रिल 2020

"चंद्रशेखरजी कदम बात कर रहे है? प्रधानमंत्री मोदीजी आपसे बात करना चाहते है |" असे सांगून स्वीय्य सहाय्यक यांनी पंतप्रधान मोदी यांना फोन दिला. कदम उत्साहीत झाले. क्षणार्धात पंतप्रधान मोदी यांचा चिरपरिचित धीरोदत्त आवाज कदम यांच्या कानी गुंजला.

राहुरी :  "हॅलो, चंद्रशेखरजी. गाव मे हो | कैसा चल रहा हैं |" देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज कानी पडताच राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम प्रचंड उत्साहीत झाले. दोन मिनिटांच्या संभाषणात कदम यांनी पंतप्रधान मोदी यांना राहुरी तालुक्याचा व देवळाली प्रवरा शहराचा आढावा संगितला. आवर्जून फोन केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. कोरोना विरुद्ध संघर्षासाठी कदम यांनी पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या. 

देवळाली प्रवरा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून स्वयंसेवक असलेल्या कुटुंबाचे तिसऱ्या पिढीतील सदस्य शिर्डीच्या श्री साईबाबा देवस्थान ट्रस्टचे माजी उपाध्यक्ष, राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रमणध्वनीवर संवाद साधला.
आज सकाळी नऊ वाजता माजी आमदार कदम यांचा भ्रमणध्वनी वाजला. "चंद्रशेखरजी कदम बात कर रहे है? प्रधानमंत्री मोदीजी आपसे बात करना चाहते है |" असे सांगून स्वीय्य सहाय्यक यांनी पंतप्रधान मोदी यांना फोन दिला. कदम उत्साहीत झाले. क्षणार्धात पंतप्रधान मोदी यांचा चिरपरिचित धीरोदत्त आवाज कदम यांच्या कानी गुंजला. 

"हॅलो...  चंद्रशेखरजी बात कर रहे है |",  
"जी हां मोदीजी मैं चंद्रशेखर कदम बोल रहा हूं |",  
"गाव में हो?"
 "जी मोदीजी... मै राहुरी तहसील मे देवलाली प्रवरा गाव मे रहता हूं |",  
 "आपके तहसील क्षेत्र में कोरोना की स्थिती कैसी है|"
"मोदीजी, राहुरी तहसील क्षेत्र मे आज तक कोरोना बाधित एक भी रुग्ण नही है | ये हमारा सौभाग्य है | हमारे देवळाली प्रवरा गांव की सभी सीमा रास्ते बंद कर दिये है |  हमारे कार्यकर्ता सीमा के रास्ते मे दिन-रात पहरा दे रहे है | बाहर का एक भी आदमी हमारे गाव मे नही आ सकता | देवळाली प्रवरा गाव मे हमने अन्नछत्र शुरू किया है | दीड हजार गरीब लोगों को दोपहर और रात को अन्न पॅकेट स्वयंसेवकोंद्वारा पहूंचाया जाता है |"
"चंद्रशेखरजी, आपका काम बहुत अच्छा चल रहा है | ऐसी ही डटे रहो | कोरोना के खिलाफ संघर्ष मे आपका योगदान बहूमोल होगा | आपसे बात करके प्रसन्नता हुई |"
"मोदीजी, देशभर मे कोरोना के खिलाफ आपका बहुत बडा संघर्ष चल रहा है | इस संघर्ष मे आपका काम बहुत अच्छा चल रहा है | हमारी शुभकामनाये आपके साथ है | 
"चंद्रशेखरजी, ये लाढाई हमें जितनी है | आपकी शुभकामनायें हमारे लिए प्रेरणास्त्रोत है | आपका बहुत बहुत धन्यवाद |"
अवघ्या दोन मिनिटाच्या या संभाषणाने पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निष्ठावंत स्वयंसेवकांच्या कामाचा, त्यांच्या आसपासच्या परिसराचा आढावा घेतला. स्वयंसेवकांचा कामाला बळ मिळेल. अशा शुभेच्छा दिल्या.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख