रोजगार, शेतकरी, शिक्षण व आरोग्य कॉंग्रेसची चतुःसूत्री : राहुल गांधी 

रोजगार, शेतकरी, शिक्षण व आरोग्य या चतुःसूत्रीवर कॉंग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर अंमलबजावणी करेल, असे आश्‍वासन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड येथे दिले.
रोजगार, शेतकरी, शिक्षण व आरोग्य कॉंग्रेसची चतुःसूत्री : राहुल गांधी 

नांदेड (जि. चंद्रपूर) : रोजगार, शेतकरी, शिक्षण व आरोग्य या चतुःसूत्रीवर कॉंग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर अंमलबजावणी करेल, असे आश्‍वासन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड येथे दिले. 

धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना राहुल गांधी यांनी उत्तरे दिली. 

यावेळी महिला शेतकरी अविशा रोकडे यांनी कर्जमुक्ती झाली तरी शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटत नाही. शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी कॉंग्रेस सत्तेत आल्यानंतर कोणत्या योजना राबविणार, हे सांगा, असा थेट प्रश्‍न अविशा रोकडे यांनी राहुल गांधी यांना विचारला. या प्रश्‍नाने काहीवेळ राहुल गांधी यांनाही विचार करायला भाग पाडले. 

यानंतर बोलताना राहुल गांधी म्हणाले, कर्जमुक्तीने प्रश्‍न सुटत नाही, हे खरे आहे. परंतु शेतकऱ्यांना काहीसा दिलासा निश्‍चितपणे मिळू शकतो. शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची आवश्‍यक आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. हा कणा जर कमजोर झाला तर देश प्रगती करू शकणार नाही. यासाठी चार मुद्यांवर आपल्याला भर द्यावा लागेल. रोजगार, शेतकरी, शिक्षण व आरोग्य या चार मुद्ये अजेंड्यावर आणावे लागेल. यासाठी कॉंग्रेस पक्ष कटीबद्ध असून कॉंग्रेस पक्ष सत्तेत आल्यास या चतुःसूत्रीच्या अंमलबजवाणीसाठी कटीबद्ध राहील, असे आश्‍वासन या महिला शेतकऱ्याला दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com