Chandrapur politics | Sarkarnama

चंद्रपुरात पैसे वाटण्याचा प्रकार? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 एप्रिल 2017

चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा कार्यकर्ता भाजपचा असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. 

नागपूर : चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा कार्यकर्ता भाजपचा असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. 

चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरूवात झाली. दुपारी 1 वाजेपर्यंत 30 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. चंद्रपुरात मतदाराला पैसे वाटण्याचा प्रकार घडल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. हा कार्यकर्ता भाजपचा असल्याचे बोलले जात आहे. एका झोपडपट्टीमध्ये हा प्रकार घडल्याचे समजते. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा तणाव निवळला. परंतु पोलिसांनी या कार्यकर्त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. 

चंद्रपूर देशातील सर्वांत उष्ण शहर म्हणून मंगळवारी नोंद झाली. चंद्रपूरचे तापमान 46.4 अंश सेल्शियस होते. या पार्श्‍वभूमीवर आज मतदान केंद्रावरील रांगा आश्‍वासक होत्या. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी काही मतदान केंद्र सजविले आहेत. मतदारांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले जात होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख