चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून इच्छुकांमध्ये गड्डमवार, वैद्य आणि निमकर 

चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी तयारी चालविली आहे. सिंदेवाही येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीतही गड्डमवार यांनी आगामी निवडणुक लढावी, असा सूर निघाला. सध्या कॉंग्रेस नेते, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून इच्छुकांमध्ये गड्डमवार, वैद्य आणि निमकर 

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी तयारी चालविली आहे. सिंदेवाही येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीतही गड्डमवार यांनी आगामी निवडणुक लढावी, असा सूर निघाला. सध्या कॉंग्रेस नेते, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे आघाडीत त्यांना येथून उमेदवारी मिळण्याची शक्‍यता कमीच असल्याचे दिसते. 

ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचा पाहीजे तसा विकास झालेला नाही. हे विधानसभा क्षेत्र सत्तेपासून नेहमीच दूर राहीले आहे. विकासाचे महामेरु म्हणविणाऱ्यांनीही अद्याप पाहीचे तसा विकास केला नसल्याचे खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सिंदेवाही येथे झालेल्या बैठकीला जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, ज्येष्ठ नेते बाबुराव गड्डमवार, दामोदर ननावार, अभिजीत मुप्पीडवार, बाबुलाल डांगे, मनोज सैनी, राजेश्‍वर गायकवाड, जगदीश मोहुर्ले, कमलाकर बोमनपल्लीवार, राजू वानखेडे, राजू ताडाम आदी उपस्थित होते. 

राजुरा मतदारसंघातून सुदर्शन निमकर आणि बल्लारपूर मधून राजेंद्र वैद्य हे इच्छुक आहेत. गड्डमवार, वैद्य आणि निमकरांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्जसुद्धा केलेला आहे. राजुऱ्यातून भाजपचे अॅड. संजय धोटे आमदार आहेत. तर बल्लारपूरचे प्रतिनीधित्व राज्याचे वन, नियोजन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार करतात. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com