चंद्रपूर-आर्णीत  काँग्रेसतर्फे देशमुख, पुंगलिया की वडेट्टीवार ? 

.
chandrapur
chandrapur

नागपूर : लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरवात होत आहे. मात्र, आर्णी-चंद्रपूर लोकसभेकरिता अद्याप काँग्रेसने उमेदवार जाहीर केला नसून दररोज नवनवीन नावाची चर्चा लोकसभा क्षेत्रात सुरू असल्याने कार्यकर्ते बुचकळ्यात सापडले आहे. 

भाजप व सेनेची युती झाल्याने नाराज झालेल्या आमदार बाळू धानोरकर काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती . पण धानोरकरांनी आपण काँग्रेसमध्ये जाणार नाही असे सरकारणामाकडे स्पष्ट केले .  शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना भेटून त्यांनी आर्णी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला मिळावा, अशी मागणीही केली होती. मात्र, पक्षश्रेष्ठीकडून प्रतिसाद मिळाला नाही . त्याकरिता चंद्रपूर येथील काँग्रेसचा एक गट त्यांना मदतही करीत आहे. 

काँग्रेसमधील बड्या नेत्यांची दिल्लीत भेट घेऊन धानोरकर यांनी मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांची भेटही घेतली अशीही चर्चा होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी नुकतेच भाजपातून काँग्रेसवासी झालेले आशिष देशमुख यांनीही या लोकसभेवत आपला दावा केला आहे. त्याकरिता त्यांनी वणी येथील माजी आमदारांची भेट घेऊन आपली शिफारस करण्याची गळ घातल्याची खमंग चर्चा सुरू आहे.

तर माजी खासदार नरेश पुगलिया यांनी तिकीट आपल्यालाच मिळावी, याकरिता प्रयत्न सुरू केले आहे. आघाडीची उमेदवारीसाठी आशिष देशमुख, नरेश पुगलिया, विजय वडेड्डीवार यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नावाची चर्चा मतदारसंघात जोरदार सुरू झाल्याने नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून नामनिर्देशनपत्र भरण्याचा कालावधी सुरू झाला असून अजूनपर्यंत आघाडीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने कार्यकर्ते बुचकळ्यात सापडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com