चंद्रपूरच्या भाजप  महापौर अंजली घोटेकर म्हणतात 'मी पुन्हा येईन' !

महापौराचे आरक्षण महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाले. विद्यमान महापौर अंजली घोटेकर यांनी "मी पुन्हा येईन'चा नारा दिला आहे.
BJP Mayor
BJP Mayor

चंद्रपूर  : महापौराचे आरक्षण महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाले. विद्यमान महापौर अंजली घोटेकर यांनी "मी पुन्हा येईन'चा नारा दिला आहे. परंतु, घोटेकर यांची कार्यशैली भाजपच्या बहुतेक नगरसेवकांना पसंत नाही.

त्यामुळे घोटेकर यांच्या नावाला उघड विरोध दिसून येत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर शहरात भाजपला मोठा फटका बसला. यातील एक कारण मनपातील भाजप पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात सपाटून मार खाल्यानंतर आता महापौर निवडताना भाजप नेतृत्वाची चांगलीच कसोटी लागणार आहे. जातीय समीकरणात अनुकूल बसेल, असा चेहरा शहराचा प्रथम नागरिक म्हणून बसविला जाईल, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे.

त्यामुळे अडीच वर्षांनंतर पुन्हा मनपा निवडणुकीला सामोरे जाताना विस्कटलेल्या समीकरणांची मांडणी करण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्व महापौर निवडीत करणार आहे. याअनुषंगाने जातीय समीकरणात बसणाऱ्या महिलेला महापौरपदाची खुर्ची दिली जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. विद्यमान महापौर कुणबी समाजाच्या आहे. त्यामुळेच नगरसेविका अनुराधा हजारे आणि वंदना तिखे यांची नावे चर्चेत आहे. हजारे या तेली आणि तिखे या माळी समाजाच्या आहेत. 

 
हे दोन्ही समाज लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपपासून दुरावले. त्यांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाईल. हजारे या माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या, तर तिखे या मुनगंटीवार यांच्या गोटातील आहेत. या दोन्ही नावांवर एकमत झाले नाही, तर आशा आबोजवार यांच्याही नावाची चर्चा महापौरपदासाठी होऊ शकते. आबोजवार भाजपच्या जुन्या कार्यकर्त्या आहे.

निष्ठावंत म्हणून घोटेकर यांच्याप्रमाणे आबोजवार यांनाही संधी दिली जाऊ शकते. मात्र, अहीर, मुनगंटीवार आणि श्‍यामकुळे यांच्यातील "मधूर' सबंध बघता कुणाच्या नावावर एकमत होते, हे बघणे औत्सुक्‍याचे राहील. सोबतच माजी महापौर राखी कंचर्लावार यांच्या नावाला भाजप नगरसेवकांच्या एका गटाची पसंती आहे. या नगरसेवकांची भूमिकाही महापौर निवडीत महत्वाची राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com