चंद्रकांत पाटील शनिवारी बारामतीत

बारामतीत दुपारी दीड वाजता भाजप कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलकार्यकर्त्यांशी विचारविनिमय करणार आहेत. पक्षसंघटना बांधणीच्या दृष्टीने तसेच आगामी काळातील निवडणुकांची व्यूहरचना करण्याचा विषय त्यांच्या अजेंड्यावर आहे.
Chandrakant Patil to take Meeting of Baramati BJP Workers
Chandrakant Patil to take Meeting of Baramati BJP Workers

बारामती : राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर स्थिरस्थावर झालेल्या भाजपने आता पुन्हा एकदा नव्याने संघटनाबांधणीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूकीदरम्यान दिलेला शब्द पाळण्याच्या दृष्टीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शनिवारी (ता. 4) बारामतीत येत आहेत. भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी ही माहिती दिली. 

बारामतीत दुपारी दीड वाजता भाजप कार्यालयात ते कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करणार आहेत. पक्षसंघटना बांधणीच्या दृष्टीने तसेच आगामी काळातील निवडणुकांची व्यूहरचना करण्याचा विषय त्यांच्या अजेंड्यावर आहे. प्रत्येक निवडणूक गांभीर्याने लढविणार, असा शब्द निवडणूकीदरम्यान पाटील यांनी दिला होता, त्या नुसार या बैठकीत ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे मोटे यांनी सांगितले. 

बारामती अगोदर लासुर्णे येथे रामभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी भेट, दुपारी बारा वाजता हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्या नंतर बारामती कार्यालयात ते कार्यकर्त्यांशी चर्चा करुन मग पिंपरी चिंचवडला जाणार आहेत.  सत्ता स्थापनेनंतर प्रथमच भाजपच्या गोटातून खुद्द प्रदेशाध्यक्ष बारामतीत येत पक्षबांधणीसह निवडणुकांबाबत लक्ष केंद्रीत करण्यास प्रारंभ करणार असल्याने पाटील यांच्या या बारामती भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 

विधानसभा हे आमचे लक्ष्य नाही, लोकसभाच लक्ष्य असे वारंवार पाटील यांनी स्पष्ट केले होते, त्या नुसार त्यांनी आतापासूनच ही व्यूहरचना आखण्यास प्रारंभ केल्याचे भाजपच्या गोटातून सांगितले गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com