चंद्रकांतदादांनी `टिमक्याची चोली` गात टाळ्या घेतल्या...

चंद्रकांतदादांनी `टिमक्याची चोली` गात टाळ्या घेतल्या...

पुणे : निकालाच्या आकड्यांची जुळवाजुळव होतेय, कोण जिंकणार, कोण हरणार ? यावर पैजा लावल्या जातायेत, संख्याबळाचे अंदाज येतायेत, या साऱ्यांत राजकीय माहोल गरम झालाय. पण पुण्यातल्या निवडणूक रिंगणातल्या उमेदवारांनी मंगळवारी धमाल केली.

राज्याचे लक्ष वेधून घेतलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी तर चक्क कोळीगीत गात उपस्थितांची मने जिंकली. ज्येष्ठ वात्रटटिकाकार रामदास फुटाणे यांनी वात्रटटिका सादर करीत राजकारणी, राजकीय पक्षांवर फटकारे ओढले. निकालाचा ताण असूनही या कार्यक्रमात उमेदवाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर पाहायला मिळाली.

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येनिमित्त खास राजकारण्यांसाठी दिवाळीचा राजकीय-सांस्कृतिक फराळ कार्यक्रम घेण्यात आला. महापौर आणि कसब्यातील भाजपच्या उमेदवार मुक्ता टिळक, चंद्रकांतदादा, खासदार गिरीश बापट, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर, अश्‍विनी कदम, सिध्दार्थ शिरोळे, वसंत मोरे, विशाल धनवकडे यांच्यासह चित्रपट, संगीत, नाट्य क्षेत्रातील मंडळींनी हजेरी लावली होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी, निवेदक सुधीर गाडगीळ यांनी राजकीय नेत्यांशी संवाद साधला. त्याप पाटल यांनी कोळी गितांची आवड असल्याचे सांगून, "टिमक्‍या ची चोळी बाई' हे गाणं त्यांनी गायलं. तेव्हाच, गेल्या काही दिवसांत पुणेकरांच्या सतत सहवासात राहिल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. त्यापाठोपाठ डॉ. गोऱ्हे यांनी "प्रेम" या विषयावर कविता सादर केली. पाटील आणि डॉ. गोऱ्हेंचा उत्साह पाहून उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. गाण्यापाठोपाठ पाटील यांनी पुणेकरांसोबतचे अनुभव आणि काही किस्से सांगितल्याने कार्यक्रम रंगला. पुण्यातील खाद्यसंस्कृतीची विशेषत : मिसाळची वैशिष्ट सांगून बापट यांनी कार्यक्रमात हशा पिकविला. अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे, विनोद सातव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com