इंदुरीकरांच्या एका वाक्‍याने त्यांची तपश्‍चर्या वाया घालवू नका - चंद्रकांतदादा पाटील

इंदुरीकरांच्या एका वाक्‍याने त्यांची तपश्‍चर्या वाया घालवू नका - चंद्रकांतदादा पाटील

पुणे : " इंदुरीकर महाराज जे वाक्‍य बोलले ते चुकीचे आहे, मात्र एका वाक्‍यामुळे त्यांची तपश्‍चर्या वाया घालवू नका. त्यांची किर्तनं लोकप्रबोधन करणारी आहेत. असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. इंदुरीकर एका वादग्रस्त विधानाने अडचणीत आल्यावर दोन दिवस त्यांच्यावर टीका होत होती. काही संघटना त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी करत आहेत. त्याचवेळी इंदुरीकरांच्या पाठीशी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याचे चित्र सोशल मीडियावर दिसत होते. त्यांच्या समर्थनार्थ हॅशटॅग सुरू आहेत. काल आमदार सदाभाऊ खोत,आमदार सुरेश धस यांनी इंदुरीकरांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत त्यांना पाठिंबा दिला होता. 

आज चंद्रकांत पाटील यांनीही इंदुरीकरांचे विधान चुकीचे आहे, मात्र त्यांच्या एका वाक्‍यामुळे त्यानी आजवर जे विधायक काम केले आहे किंवा त्यांनी जी तपश्‍चर्या केली आहे ती वाया घालवू नका."असे म्हणत त्यांची बाजू घेतली आहे. दरम्यान संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनीही "इंदुरीकरांचा नावलौकिक ज्यांना खुपतो तेच लोक त्याना टार्गेट करत आहेत. इंदुरीकरांनी ग्रामीण महाराष्ट्राचे प्रबोधन केले आहे."असे सांगत त्यांची बाजू घेतली आहे. 

सातारा तालुक्‍यातील शिवथर येथील सामाजिक कार्यकर्ते शिवराम ठवरे यांनी 'निवृत्ती महाराज यांच्या जीवाला धोका असून त्याना गृह खात्याने पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथराव पाटील यांनीही निवृत्ती इंदुरीकरांची बाजू घेत,"भूकंणाऱ्यांना भुंकू द्या. तुम्ही तुमचे प्रबोधनाचे काम सुरू ठेवा."असा सल्ला दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com