दिल्लीतील निवडणुकीत चंद्रकांतदादांसह पुण्यातील 25 जण सक्रीय...

 दिल्लीतील निवडणुकीत चंद्रकांतदादांसह पुण्यातील 25 जण सक्रीय...

पुणे : दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. भाजपा आणि आम आमदमी पार्टीत आरोप-प्रत्योरोपांच्या फैरी सुरू आहेत. मात्र, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत देशातील प्रमुख राज्यांतील पक्षाचे नेते या निवडणुकीत ठाण मांडून आहेत. प्रचारादरम्यान मतदारांच्या घरी जाऊन प्रचार साहित्य वाटल्याची या नेत्यांची छायाचित्रेदेखील प्रसिद्ध झाली आहेत. या साऱ्या प्रचारात कॉंग्रेसमध्ये याप्रकारे प्रचार करताना कुणी दिसत नाही. निवडणुकीचा निकाल काहीही असेल. मात्र, या प्रकारे प्रचाराचे यंत्रणा आणि संघटना म्हणून तळागाळात पोचण्याची भाजपा नेत्यांची मानसिकता हे भाजपाचे वेगळेपण मानायला हवे. 

प्रचार पत्रके वाटताना भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचे छायाचित्र आज प्रसिद्ध झाले आहे. चंद्रकांत पाटील यांनीही ट्‌विट करून दिल्लीतील प्रचाराचे चित्र राज्यातील जनतेपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. वर्षभर देशातील कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुका सुरू असतात. प्रचार, मतदान आणि निवडणुकांचा निकाल हा लोकशाहीतील प्रक्रियेचा भाग आहे. मात्र, या साऱ्या प्रक्रियेकडे भाजपा ज्या नियोजनबद्धरित्या पाहते आणि संघटना म्हणून त्याची अंमलबजावणी करते तशी यंत्रणा देशातील अन्य कोणत्याही पक्षाकडे दिसत नाही. दिल्ली निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपाची मोठी यंत्रणा कामाला लागली आहे. 

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, विनोद तावडे यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. प्रचारसभांमध्ये भाषण करणाऱ्या या नेत्यांव्यतिरिक्त प्रत्यक्ष "ग्राऊंड'वर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या दोनशेहून अधिक आहे. प्रदेश संघटनेतील महत्वाचे पदाधिकारी सध्या दिल्लीत आहेत. यात पुण्यातील सुमारे 25 कार्यकर्त्यांचा समावेश आहे. बूथ नियोजन आणि पत्रके वाटपापासून अंतर्गत समन्वयासारख्या अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या या कार्यकर्त्यांकडे आहेत. निवडणुकीचा निकाल काहीही लागो. मात्र, मतदारनोंदणीपासून निवडणुकीतील प्रचार आणि त्यासाठी लागणारी सारी यंत्रणा उभी करण्यासाठी आवश्‍यक असलेले नेटवर्क उभी करण्याची क्षमता जितकी भाजपाकडे आहे तशी यंत्रणा सध्यातरी अन्य कोणत्याही पक्षाकडे दिसत नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com