chandrakant thakare birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस - चंद्रकांत ठाकरे, मंगरुळपिर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 25 मे 2019

चंद्रकांत ठाकरे शिक्षण क्षेत्राबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, बाजार समितीचे सभापतीपद आजही पारदर्शकपणे पार पाडत आहेत.

मंगरुळपिर: एकेकाळी मंगरुळपिर तालुका हा शैक्षणिकदृष्टया अत्यंत मागासलेला होता. या तालुक्यात सण १९९५ पर्यंत जेमतेम १२व्या वर्गापर्यंत शिक्षण होते. पुढील शिक्षणासाठी विध्यार्थ्यांना अकोला, वाशिम करिता जावे लागत होते. परंतु उच्च शिक्षित व राजकारणाची कास असलेल्या चंद्रकांत ठाकरे यांना ही बाब खटकली. वडील सुभाषराव ठाकरे राज्याचे मंत्री होते. परंतू चंद्रकांत ठाकरे यांनी तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जावे तरी कुठे म्हणून मंगरुळपिर येथे यशवंतराव चव्हाण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालयाची सुरुवात केली. आज या महाविद्यालयात प्रत्येक जातीधर्माच्या गोरगरिबांचे पाल्य उच्च शिक्षण घेत आहेत. येथील मुस्लिम समाजातील शेकडो विध्यार्थीनी पदवी व पदव्युत्तर पर्यन्तचे शिक्षण घेत आहेत. अनेक गोरगरीब विद्यार्थी व विद्यार्थिनी या महाविद्यालयातून देशभरात विविध पदावर कार्यरत आहेत. ४० टक्के राजकारण व ६० टक्के समाजकारण हा महामंत्र त्यांनी आपले वडील माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांच्याकडून घेतला. 

शिक्षण क्षेत्राबरोबरच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, बाजार समितीचे सभापती असे पद आजही ते तेवढ्याच पारदर्शकपणे पार पाडत आहेत. तालुक्यातील गोरगरीब व्यक्ती त्यांच्या कडे आपले प्रश्न घेऊन गेल्यावर ते त्यांचे समाधान करून पाठवितात. शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी अनेकवेळा त्यांनी शेकडो आंदोलने केली व प्रश्न मार्गी लावले, आज २५ मे त्यांचा वाढदिवस. मंगरुळपिर तालुक्यातीलच नव्हे, तर वाशिम जिल्ह्यातील सर्वसामान्यांनी त्यांना प्रत्यक्ष व अप्रतक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख