chandrakant patil warns sanjay mandlik | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 5 वाजे पर्यंत 62.86% मतदान
सिंधुदुर्गात सरासरी 60 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडला सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले सरासरी ४८.३७ टक्के मतदान.
बारामतीत संध्याकाळी पाच पर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत 50.29 टक्के मतदान
परभणी जिल्ह्यात दु. ३ पर्यंत 47.53 टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3.00 पर्यंत 38.93% मतदान
जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 39.96% मतदान
बीड परळी - दुपारी ३ पर्यंत ४७.१८ टक्के मतदान
नाशिकला दुपारी ३ पर्यंत ४५ टक्के मतदान
ठाणे जिल्हा : दुपारी 3.00 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदान
हडपसर मतदार संघातून दुपारी तीन वाजेपर्यंत 41.16 टक्के मतदान

भले-भले आम्हाला घाबरतात; सेनेच्या मंडलिकांना दम!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही.

कोल्हापूर : आम्ही साधे भोळे नाही, भले-भले आम्हाला घाबरतात, त्यामुळे एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी युती धर्म पाळावा, अजूनही वेळ गेलेली नाही अन्यथा त्यांना आमचे दरवाजे कायमचे बंद राहतील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

शिवसेनेला जिल्ह्यातील आठ जागा जिंकायच्या आहेत, त्यामुळे श्री. मंडलिक यांनी सोयीचे राजकारण विसरावे अशी आठवण करून देत श्री. पाटील यांनी एकप्रकारे सेनेच्या नेतृत्त्वालाच इशारा दिला आहे.

कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील भाजपाचे उमेदवार आमदार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात श्री. पाटील बोलत होते. सोयीचे आणि खोटे राजकारण करणारे संपणार आहेत, अडगळीत पडणार आहेत याची जाणीव झाली म्हणूनच कॉंग्रेस नेत्यांची तरूण मंडळी पटापटा बाहेर पडून भाजपात दाखल झाली. म्हणूनच मंडलिक यांनी प्रामाणिकपणे काम करावे, खोटे राजकारण सोडून द्यावे, अशी श्री.पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी आमदार अमल महाडिक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संदेश कचरे, आजच स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून भाजपात आलेले जिल्हाध्यक्ष भगवान काटे, कॉंग्रेसमधून भाजपात आलेले दौलत देसाई यांची भाषणे झाली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख