उद्धव मोदींना भेटण्यासाठी तीन महिने बिचकत होते!

शरद पवारांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या घटनेवर आधारित व्यवस्थेवरच अविश्‍वास दिसत आहे. राम मंदिरासाठी ट्रस्ट उभारणीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे.
chandrakant patil taunts udhhav thackrey
chandrakant patil taunts udhhav thackrey

सांगली: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीस लवकर जाण्याची गरज होती. पण, तीन महिने ते बिचकत होते, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटली यांनी लगावला. 

मोदी- ठाकरे भेटीविषयी पाटील म्हणाले, दोन भाऊ भांडून वेगळे रहात असले तरी भावनिक नाते आहेच. मात्र त्यांना भेटण्यासाठी उशीरच झाला. मुख्यमंत्री झाल्यावर लवकर जाण्याची गरज होती. पण, तीन महिने ते बिचकत होते. पवार काय म्हणतात, थोरात काय म्हणतात, असे त्यांना वाटत असावे. मात्र आता ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागले आहेत. अयोध्येला जाणार आहेत, एनपीआर करु म्हणत आहेत. आता ते धाडस करत आहेत. दोन भाऊ एकत्र येतील की नाही हे काळच ठरवेल अशीही पुस्ती त्यांनी जोडली.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येवून सत्ता करणे हा जनादेशाचा अनादर आहे. मात्र अजितदादांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणे हा जनादेशाचा अनादर नव्हता असे चंद्रकांत पाटील म्हणाले म्हणाले, विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महिनाभर सरकार स्थापन झाले नाही. नैसर्गिक युती असताना त्याला प्रतिसाद न देता शिवसेनेने कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी संधान बांधले. त्यामुळे आम्ही एक मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. निकाल पुर्ण लागण्यापुर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. तसेच एकदाही ते चर्चेला आले नाहीत. 
 
राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्ट उभा केला, मग मशिदीसाठी का नाही? असा प्रश्‍न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केल्याबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवारांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या घटनेवर आधारित व्यवस्थेवरच अविश्‍वास दिसत आहे. राम मंदिरासाठी ट्रस्ट उभारणीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे. त्यांनी मशिदीसाठी ट्रस्टचा का नाही निर्णय दिला? एका बाजूने घटनेवर विश्‍वास आहे, म्हणायचे आणि घटनेच्या आधारे असलेल्या सगळ्या व्यवस्थेला विरोध करायचे हे पवारांचे धोरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com