तुम्हाला दोन-पाच लाख घरी नेण्यासाठी निवडून दिलेले नाही!  - chandrakant patil statement about corruption | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

तुम्हाला दोन-पाच लाख घरी नेण्यासाठी निवडून दिलेले नाही! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 मे 2018

कोल्हापूर : मतदारसंघाच्या, समाजाच्या विकासासाठी तुम्हाला निवडून दिले आहे, दोन-पाच लाख रूपये घरी नेण्यासाठी नाही, या शब्दांत आज महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्यांना सुनावले. 

जिल्हा परिषदेत नव्याने उभारण्यात आलेल्या रस्ते दुरूस्ती प्रगती नियंत्रण कक्षाचे उद्‌घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक होत्या. 

येत्या दोन वर्षात विकासासाठी पैसेच द्यावे लागणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण करणार असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले,"आतापर्यंतचा निधी हा रस्ते दुरूस्तीसाठीच वापरला जातो. इथून पुढे हा निधी विकास, रोजगार निर्मिती यासाठी वापरला जाणार आहे. चांगले व दर्जेदार रस्त्यासाठी हा कक्ष स्थापन केला आहे. या कामातील टक्केवारी आम्ही निकालात काढली आहे. आतापर्यंत 30 हजार कोटीची कामे असून 80 वर्क ऑडर ह्या कोणत्याही टक्केवारीशिवाय दिल्या आहेत. गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करण्याचे सरकारचे धोरण आहे. आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागात दोन हजार जणांना पदोन्नती दिली आहे. तर तक्रार असलेल्या 200 जणांना निलंबित केले आहे.' 
जिल्हा परिषद सदस्यांनी निधी व्यवस्थित खर्च करावा. लोकांनी गटर, रस्ता यासारख्या कामांचा विकास करण्यासाठी तुम्हाला निवडून दिले आहे, हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, सभापती अंबरिष घाटगे, सर्जेराव पाटील-पेरीडकर, डॉ. हरीश जगताप आदि उपस्थित होते. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख