chandrakant patil speaks about pankaja munde | Sarkarnama

पंकजा मुंडेंच्या पक्षबदलाच्या केवळ अफवा - चंद्रकांत पाटील

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 डिसेंबर 2019

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांमध्ये काही दम नाही. त्या काल, आज आणि उद्याही भाजपमध्येच राहतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

पुणे - भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या पक्षबदलाबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांमध्ये काही दम नाही. त्या काल, आज आणि उद्याही भाजपमध्येच राहतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, की दरवर्षी 12 डिसेंबर रोजी गोपिनाथ मुंडे यांच्या जन्मदिनादिवशी मोठा कार्यक्रम होत असतो. पराभवानंतर `आपलं काय चुकलं ही आत्मपरिक्षणाची मनस्थिती' म्हणजे पक्षबदलणार असे होत नाही. काल, आज आणि उद्याही पंकजा मुंडे भाजपमधीलच असतील. पंकजा मुंडे यांचे वडील गोपिनाथ मुंडे यांनी कधीही भाजपबाबत वेगळा विचार केला नाही. 

पंकजा मुंडे या गोपिनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत म्हणून राजकारणात नाहीत. त्यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख