साताऱ्याच्या कारभाराची सूत्रे शिवेंद्रसिंहराजेंकडे देणार: चंद्रकांतदादा

भाजपाची सत्ता येणारच, हे माहित असताना देखील शरद पवार झोपेचे सोंग घेत आहेत. पश्चिम महाराष्ट्र हा येत्या काळात राष्ट्रवादीमुक्त होईल, असा दावाही श्री. पाटील यांनी केला.
साताऱ्याच्या कारभाराची सूत्रे शिवेंद्रसिंहराजेंकडे देणार: चंद्रकांतदादा

सातारा :  भाजपच्या माध्यमातून असंख्य विकासकामे झाली आहेत. यामुळे युतीचे सरकार येणार हे स्पष्ट आहे. या सरकारमध्ये सातारा जिल्ह्याच्या कारभाराची सूत्रे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हाती देणार, अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर सभेत केली. 

कुडाळ (ता. जावली) येथे सातारा- जावली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत पाटील बोलत होते. यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार सदाशिव सपकाळ, अमित कदम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बुवासाहेब पिसाळ, पंचायत समितीचे सदस्य सौरभ शिंदे, शिवसेना संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, रिपाईचे तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे, उद्योजक ज्ञानदेव रांजणे, योगेश गोळे, माजी उपसभापती रवी परामणे, नगरसेवक धनंजय जांभळे, सुशील मोझर उपस्थिती होती. 

श्री. पाटील म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला असून त्यांना वेळोवेळी भरीव मदत सरकारने केली आहे. वर्षाला ३२०० कोटींचा पिक विमा शेतकऱ्यांना देऊन, जलयुक्त शिवारमधून वर्षाला एक लाख ७२ हजार शेततळे बांधलेली आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर देऊन शेतीच्या मालालाही वेळोवेळी योग्य भाव सरकारने दिला आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, दादा तुमची साथ व मुख्यमंत्र्यांचा विश्वास हा आमच्या पाठीशी असल्याने येथील महत्त्वकांक्षी प्रकल्प व उर्वरित सर्व विकासकामे ही येत्या काळात पूर्ण करणार आहे. मी बोलत नाही माझे काम बोलते. 

यावेळी सरपंच वीरेंद्र शिंदे, दत्ताजी थोरात, नगरसेवक विजय काटवटे,पांडुरंग जवळ, विजय मोकाशी, मोहन कासुर्डे, शिवसेना तालुकाप्रमुख विश्‍वनाथ धनवडे, मच्छिंद्र सकटे, सागर भिसे, जिल्हा बँक संचालिका सौ,कांचन साळुंखे, सचिन जवळ, नितीन पार्टे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ  उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com