chandrakant patil on new government | Sarkarnama

`पंकजा मुंडेंच्या पक्षबदलाची अफवा ही अपघातानं आलेल्या सरकारच्या डोक्यातील कल्पना'

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 डिसेंबर 2019

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या पक्षबदलाच्या अफवा या अपघातानं आलेल्या सरकारच्या डोक्यातील नव्या कल्पना आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

पुणे - भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या पक्षबदलाच्या अफवा या अपघातानं आलेल्या सरकारच्या डोक्यातील नव्या कल्पना आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

पंकजा मुंडे यांनी काल फेसबुकवर पोस्ट लिहून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे मुंडे पक्ष बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

याबाबत आज चंद्रकांतदादांनी पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडेंच्या पक्षबदलाच्या केवळ अफवा असल्याचे सांगितले आणि सरकारवर टीका केली. चंद्रकांतदादा म्हणाले, की अपघातानं सरकार आले आहे. किती दिवस सरकार टिकणार हे माहीत नाही. त्यांच्या डोक्यातून अशा नव्या-नव्या कल्पना येतात. परंतु या कल्पना कधीही व्यवहारात येणार नाहीत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख