'कोल्हापूर उत्तर'मधून लढणार ही अफवा!   

आपण विजयाच्या समीप असताना मित्रपक्षाला मतदारसंघ सोडणे शक्‍य नाही. दहा वर्षात रात्रीचा दिवस करून आम्ही काम केले. हजारो लोकांना न्याय दिला त्यामुळे आपली हॅटट्रिक निश्‍चित असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.
'कोल्हापूर उत्तर'मधून लढणार ही अफवा!   

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढविणार असल्याच्या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज  सांगितले.

ते म्हणाले, "मी राज्यभर फिरत आहे. पक्षाचे काम करत आहे. कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढविणार यात काहीही तथ्य नाही. अशा बातम्या येत राहतात. मी निवडणूक लढविणार नाही. उत्तरचा मतदारसंघ शिवसेनेकडून काढून घेऊन भाजपला दिला जाईल. आणि चंद्रकांत पाटील उमेदवार असतील अशी चर्चा होती. त्यावर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. 

मध्यंतरी भाजप कार्यकर्त्यांनी आमदार क्षीरसागर यांच्या उमेदवारीला विरोध केला. क्षीरसागर सोडून कोणालाही उमेदवारी द्या अशी त्यांची मागणी होती. त्या पार्श्‍वभूमीवर हा मतदारसंघ बदलला जाईल की का अशी चर्चा होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com