Chandrakant Patil joins RSS parade | Sarkarnama

चंद्रकांतदादांचा संघाच्या  संचलनात सहभाग

सदानंद पाटील
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

रंकाळा परिसरात सकाळी साडेसात वाजता या संचलनास सुरुवात झाली.

कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दसऱ्यानिमित्त गुरुवारी (१८ ऑक्टोबर) रंकाळा परिसरासह खराडे कॉलेजच्या मैदानात संचलन करण्यात आले. या संचलनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला.

 

 

शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या विजयादशमीला डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यानिमित्त संघातर्फे प्रत्येकवर्षी पथ संचलनाच्या माध्यमातून विजयादशमी उत्सव साजरा केला जातो. त्यानुसार आज शहरात घोष व वाद्यांच्या गजरात पथ संचलन करण्यात आले. 

रंकाळा परिसरात सकाळी साडेसात वाजता या संचलनास सुरुवात झाली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनीही सहभाग घेतला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख