जायका प्रकल्प चंद्रकांत पाटील मार्गी लावणार का ? 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मेट्रोच्या कामाला गती देण्यापासून नदी सुधारणेचा बहुचर्चित जायका प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे आव्हान पाटील यांच्यासमोर आहे.
जायका प्रकल्प चंद्रकांत पाटील मार्गी लावणार का ? 

पुणे : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मेट्रोच्या कामाला गती देण्यापासून नदी सुधारणेचा बहुचर्चित जायका प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे आव्हान पाटील यांच्यासमोर आहे. 

विधानसभा निवडणुकीची आचारसहिंता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात लागू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जायकासारखा रेंगाळलेला आणि शहराच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प नवे पालकमंत्री पाटील मार्गी लावणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

गिरीश बापट यांची खासदार म्हणून निवड झाल्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे बापट यांच्या जागी पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पाटील यांच्याकडे कोल्हापूर व जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती. नव्या बदलानुसार पाटील यांच्याकडील जळगावची जबाबदारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तर पुण्याची जबाबदारी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पाटील यांच्याकडे पुण्याबरोबरच कोल्हापूरची जबाबदारी कायम आहे. 

पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाचा रखडलेला प्रश्‍न मार्गी लावण्याचे महत्वाचे काम पाटील यांना पार पाडावे लागणार आहे. शिवाय मेट्राचे उर्वरित काम गतीने मार्गी लावणे, मेट्रोच्या नव्या मार्गांची आखणी आणि त्यासाठी आवश्‍यक मंजुरी, जायका प्रकल्पाची अंमलजबाणी, भामा आसखेड पाणी योजना, पीएमआरडीएचा शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्ग, रिंग रोडमधील भूसंपादनाचे अडथळे, शहरांतर्गत वर्तुळाकार मार्ग (एचटीएमसीआर) हे शहराच्या दृष्टीने महत्वाचे विषय मार्गी लावणे ही पाटील यांच्यापुढील आव्हाने आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com