चंद्रकांतदादा तर पुरात फिरकलेच नाही : सतेज पाटील

कोल्हापूरला पुराचा वेढा असताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पूरपरिस्थिती पाहण्यासाठी कोल्हापुरात फिरकलेच नाहीत, -आमदार सतेज पाटील
Chandrakant Patil_Satej Patil
Chandrakant Patil_Satej Patil

कोल्हापूर  : कोल्हापूरला पुराचा वेढा असताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पूरपरिस्थिती पाहण्यासाठी कोल्हापुरात फिरकलेच नाहीत, असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी आज केला. 

आज मोर्चा काढणार म्हटल्यानंतर कर्जमाफीच्या  जिआर मध्ये बदल केला आहे. मात्र पूर्वीचा  अनुभव पाहता जोपर्यंत जाहीर केलेल्या घोषणाची खर्‍या अर्थाने अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत यांच्यावरती किंवा या सरकार वरती विश्वास ठेवता येणार नाही,  असाही टोला आमदार पाटील यांनी दिला. पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापुरातील दसरा चौक येथून आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी ते बोलत होते.

आमदार सतेज पाटील म्हणाले,  राज्य शासनाने कर्जमाफीचा फार्स केला आहे. पूर्वीची कर्जमाफी अजुनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे शेतकऱ्यांची यामध्ये खूप मोठी दिशाभूल झाली आहे. ज्यावेळी कोल्हापूरला पुराने वेढा घातला होता त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर पाहिला असता तर पुराचे रौद्र रूप त्यांना पाहता आले असते . मात्र पुराच्या वेळी ते दोन दिवस कोल्हापुरात फिरकलेच नाही, अशीही टीका श्री पाटील यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com