औरंगाबादचे नाव बदलाच, आपण `त्याचे` वंशज नाही - चंद्रकांत पाटील

..............
 औरंगाबादचे नाव बदलाच, आपण `त्याचे` वंशज नाही - चंद्रकांत पाटील

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत आम्ही विजय मिळवणारच असे सांगत, शहराचे नाव संभाजीनगर व्हायलाच हवं, आपण सगळे शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे वंशज आहोत, आपण औरंगजेबाचे वंशज नाहीत, त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करून नाव बदलायला हवे असा सूचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनाला लगावला. चंद्रकांत पाटील औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दिवसभर ते मॅरेथॉन बैठका घेत आहेत. यावेळी त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. 

पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीत ताकद लावली तर आम्हाला संधी आहे, म्हणून शहरात आलोय. बैठका घेत आहे. शेतकरी कर्जमाफी म्हणजे " नाचता येईना अंगण वाकडे ' अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय. ही फक्त घोषणा आहे, मनापासून नाही, आता म्हणतात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे यादी जाहीर करता येणार नाही, मग जे कायदे या आठवड्यात केले ते सगळे रद्द करा, सरपंच निवड कायदा, बाजारसमिती निवडणूक कायदा हे सगळे कायदे रद्द करावे, आम्ही राज्यपालांना निवेदन दिलाय असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

पाथर्डी येथील शेतकरी आत्महत्या दुर्दैवी आहे, शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न केले. त्यांना मदत करायला हवी, आमच्या सरकारने केलं, जोपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही, भाववाढ मिळणार नाही ही परिस्थिती अशीच राहणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. औरंगाबादच्या गंगापूरमध्ये छेडछाडीची घटना झाली आहे. हे वाढतच आहे, आमच्या सरकारने भरपूर काम केलं, मात्र आता हे सगळं विस्कळीत झालं आहे, कायद्याचा धाक उरला नाहीये, गुंड बिळातून बाहेर पडले आहेत, आम्ही उद्धवजीना म्हटले की, गृहखाते तुमच्याकडे ठेवा, मात्र कुणीच इंटरेस्टेडेट नाही असं चित्र असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com