मुख्यमंत्र्यांना कशामधले कळते ? - चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्र्यांना कशामधले कळते ? - चंद्रकांत पाटील

गृहखाते घ्यायला कोणी तयार नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगत आहेत. पवार हास्यास्पद बोलत आहेत. गृहखाते नको असेल तर ते शिवसेनेला द्यावे, असा सल्लावजा चिमटा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांना काढला. नव्या सरकारमधील तिन्ही घटक पक्षांत काय चालले आहे ? याचा थांगपत्ता कोणालाच नाही, अशी टीका पाटील यांनी केली.

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकर आणि हेक्‍टरमधील फरक कळत नाही. साखरेचा विषय पुढे आला तर ते जयंत पाटील यांच्याकडे बोट करतात. महसूलबाबत बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहातात. मग यांना कशातले कळते ? अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांवर केली. "आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का ? अशी विचारणा करीत, पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची खिल्ली उडविली. 

पुण्यात पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, "" लोकांचे प्रश्‍न सोडवायचे तर कोणते खाते कोणाकडे हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांना कळनासे झाले आहे. राज्यातील ऊसशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे; मात्र त्यांना पुरेशी नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सरकार करीत नाही. हे सरकार निर्णय घेत नसून, केवळ सहा मंत्र्यांच्या माध्यमातून घेतलेले निर्णय बेकायदा आहेत. मंत्रीमंडळ विस्तार का करीत नाहीत, हे कळायला मार्ग नाही.'' 

गृहखाते घ्यायला कोणी तयार नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगत आहेत. पवार हास्यास्पद बोलत आहेत. गृहखाते नको असेल तर ते शिवसेनेला द्यावे, असा सल्लावजा चिमटा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांना काढला. नव्या सरकारमधील तिन्ही घटक पक्षांत काय चालले आहे ? याचा थांगपत्ता कोणालाच नाही, अशी टीका पाटील यांनी केली. 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अन्य कोणत्याही राजकीय पक्षांत जाणार नसल्याचे सांगत, खडसे यांची नाराजी दूर झाली आहे, असे सूतोवाच पाटील यांनी केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ते भेटले, त्यांना कोणीही भेटू शकते. मीही भेटेन. त्यावरून निष्कर्ष योग्य नाही, असे पाटील यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com