शिवसेनेने जनतेच्या मताचा अनादर केला: चंद्रकांतदादा  

भाजप नेत्यांवर वारंवार टीका केली जाते, याचे दु:ख अधिक आहे.
शिवसेनेने जनतेच्या मताचा अनादर केला: चंद्रकांतदादा  

पंढरपूर : राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत देऊनही सरकार स्थापन होत नाही, हे दु:ख आहे. उद्या (शुक्रवारी) भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार नाही, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे स्पष्ट केले. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटीचे संकेत मिळाले आहेत.

कार्तिकी एकादशीची महापूजा शुक्रवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने पंढरपुरात आलेले पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजप नेत्यांवर वारंवार टीका केली जाते, याचे दु:ख अधिक आहे. कधी नव्हे राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत दिले आहे. परंतु सहकारी पक्ष शिवसेनेने जनतेच्या मताचा अनादर केला आहे. ही बाब देखील तितकीच वाईट आहे.   

यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com