chandrakant patil challenges sharad pawar | Sarkarnama

पवार तुम्ही पाटलांना ओळखलंच नाही : चंद्रकांतदादा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

पवार यांना वाटले की मला कोथरूडमध्ये अडकून ठेवता येईल. पण तसे होणार नाही.

कोल्हापूर : ''चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता मी कसा फटका लगावतो हे समजतही नाही. पवार तुम्ही पाटलांना ओळखलंच नाही'', अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.

विधानसभा निवडणुकीतील कोल्हापूर उत्तरचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ लोणार वसाहत येथे आयोजित शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या मेळाव्यात त्यांनी श्री. पवार यांच्यावर तीव्र टीका केली, त्याचवेळी त्यांनी बंडखोरांनाही इशारा दिला. युती धर्म न पाळणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करू असा दमही त्यांनी भरला.

श्री. पाटील म्हणाले,"पवार यांना वाटले की मला कोथरूडमध्ये अडकून ठेवता येईल. पण तसे होणार नाही. माझी बायको जरी विरोधी पक्षातून उभा राहीली तरी तिचा प्रचार मी करणार नाही. मी चेहऱ्यावर कोणताही हावभाव न आणता कसा फटका लगावतो हे समजत नाही, त्यामुळे पवार तुम्ही मला ओळखलेलेच नाही.' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख