उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांतदादांची गुगली

chandrakant patil asks reporters about udyanraje
chandrakant patil asks reporters about udyanraje

पुणे : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल मला काहीच माहीत नाही. तुम्हाला माहिती असेल तर सांगा, अशी गुगली महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना टाकली.

पुणे महापालिकेत पाटील आज पहिल्यांदाच आले होेते. विविध खात्यांचा आणि योजनांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल विचारले असा त्यांनी कानावर हात ठेवले.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीवरही प्रश्न विचारले. विरोधकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. मात्र कारवाई कायद्याने होणार, असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवारांसह इतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया हि न्यायालयीन आहे, त्यात राजकारण नसल्याचा दावा त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com