Chandrakant Patil Appointed as BJP State President | Sarkarnama

चंद्रकांत पाटील पुन्हा भाजप प्रदेशाध्यक्ष; मंगल प्रभात लोढांकडे मुंबईची जबाबदारी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

माजी मंत्री व आमदार चंद्रकात पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. मंगल प्रभात लोढा यांच्याकडे पुन्हा मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे

पुणे : माजी मंत्री व आमदार चंद्रकात पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. मंगल प्रभात लोढा यांच्याकडे  पुन्हा मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या नियुक्त्या आज जाहीर केल्या. पाटील यांची फेर निवड होणार असल्याची चर्चा होती. मात्र मुंबईचा अध्यक्ष बदलला जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. लोढा यांच्याऐवजी प्रसाद लाड यांना या पदावर संधी मिळणार असल्याचे असल्याचे काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. मात्र पक्षाने दोन्ही नेत्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद या निवडणुका पाटील यांच्यात नेतृत्वाखाली लढण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी मराठा चेहरा असावा, असे पक्षाचे धोरण होते त्यानुसार पाटील यांना पुन्हा आता भाजपचा कारभार हाकावा लागणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख