बाळासाहेब थोरात सज्जन आणि पापभीरू - चंद्रकांत पाटील

 बाळासाहेब थोरात सज्जन आणि पापभीरू - चंद्रकांत पाटील

पुणे - कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अनेकांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणांबाबत उच्च न्यायालयाने मागविलेली माहिती आम्ही न्यायालयाला दिलेली आहे. त्यामुळे कोणालाही कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्‍यता आहे. याची उदाहरणे देताना पाटील यांनी बाळासाहेब थोरात हे अत्यंत सज्जन आणि पापभीरु माणुस असल्याचे कौतुक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालापात शुक्रवारी (ता.2) पाटील यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांना मनमोकळी उत्तरे दिली. 

ईडी आणि आयटीची धमकी देत आम्ही विरोधी पक्षनेत्यांना पक्षात घेत असल्याच्या आरोपाचे खंडण करताना पाटील म्हणाले, "" कॉंग्रेसची सत्ता असताना त्यांनी छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांना ईडीची धमकी देऊन पक्षात घेतले होते का ? ईडी आणि आयटीची चौकशी करण्यासाठी रेकी करावी लागते. यासाठी दोन दोन वर्षांची तयारी असते. सरकारने सांगितले आणि धाड पडली असे कधी होत नाही असाही दावा त्यांनी केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.अनेकांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणांबाबत उच्च न्यायालयाने मागविलेली माहिती आम्ही न्यायालयाला दिलेली आहे. त्यामुळे कोणालाही कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्‍यता आहे. मात्र ही काही उदाहरणे सांगत असतानाच, पाटील यांनी बाळासाहेब थोरात हे अत्यंत सज्जन आणि पापभीरु गृहस्थ असल्याचे कौतुक केले. पाटील यांनी केलेल्या थोरातांच्या कौतुकामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्यातरी नुकतेच भाजपावासी झालेले थोरात यांचे कट्टर विरोधक राधाकृष्ण विखे पाटील यांना मात्र हे कौतुक कडू लागणार हे नक्की 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com