chandrakant patil and pimpari bjp | Sarkarnama

"दिल के नजदीक'वाल्यांना तिकीटे देण्याची पद्धत यापुढे चालणार नाही - चंद्रकांत पाटील

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी आमदार महेश लांडगे यांची निवड आज जाहीर झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरीत आमदार लांडगे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. भाजपा कोणा एका कुटुंबाचा पक्ष नसून, तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सध्या पक्षात " दिल के नजदीक' असलेल्या लोकांना तिकिटे देण्याची पद्धत रूढ झाली आहे. त्याला सुरुंग लावला जाईल. कोण सत्तेसाठी आला आहे, कोण आपला आहे, हे तपासण्याची वेळ आली आहे, असा इशारा पाटील यांनी या वेळी दिला. 

पाटील म्हणाले, "" पक्षात नव्याने भरती झाल्यामुळे पक्ष संस्कृती काहीशी विस्कळित झाली आहे. भाजप केवळ प्रेम, आपुलकी आणि गुणवत्तेवर चालतो. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना हे पक्ष कुटुंबाला मानणारे आहेत. भाजप पूर्वीही अटलजींचा नव्हता. मोदींचाही नाही. तो केवळ कार्यकर्त्यांचा आहे. पक्षात बुथपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड करण्यापर्यंतची प्रक्रिया लोकशाही पद्धतीने राबविणारा पक्ष आहे. शहराध्यक्ष हे पद म्हणजे काट्यांची खुर्ची आहे. ऐकणाऱ्याला प्रेम, न ऐकणाऱ्याला धाक, काम करणाऱ्याला शाबासकी आणि चुकीचे काम करणाऱ्याला शासन झाले पाहिजे. आम्ही नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहू.'' 

लांडगे म्हणाले, "" पक्षाने माझ्यावर विश्‍वासाने जबाबदारी टाकली आहे. सर्व कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन पुढील वाटचाल करणार आहे. 2022 ची निवडणूक महत्त्वाची आहे. लक्ष्मण जगताप यांचे 100 नगरसेवकांहून अधिक संख्याबळाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.'' मावळते शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप म्हणाले, "" पक्षाध्यक्ष म्हणून काम करताना खूप लोकांची नाराजी पत्करावी लागली. मात्र, जेवढा न्याय देता येईल तेवढा न्याय त्या पदाला देण्याचा प्रयत्न केला. लांडगे यांनी काठावर उभे राहण्याची भूमिका घेऊ नये. पक्षात विद्वान आणि हुशार मंडळी खूप आहेत. परंतु, सांघिक पातळीवर कमी आहोत. त्यामुळे अशा मंडळींनी पक्षासाठी योगदान द्यावे.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख