मदन भोसले विधिमंडळात दिसतीलच : चंद्रकातदादा पाटील

मदन भोसले विधिमंडळात दिसतीलच : चंद्रकातदादा पाटील

मुंबई : वाई-खंडाळा-महाबळेश्‍वर विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या तीन तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईंत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले असून वाईचे मदन भोसले विधीमंडळाच्या सभागृहात दिसणारच, असा विश्‍वास महसूल मंत्री तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. 

आमदार मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसैनिक भिलारे गुरुजी यांचे सुपूत्र अशोकराव भिलारे, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, महाबळेश्‍वरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक किसनराव शिंदे यांच्यासह महाबळेश्‍वरचे नगरसेवक सुनिल शिंदे, माजी नगरसेवक प्रशांत आखाडे, मेटगुताडचे माजी सरपंच नंदकुमार बावळेकर, रामचंद्र शिंदे, हेमंत शिंदे, तसेच पाचगणीतील माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दिलावर बागवान, नगरसेविका उज्वला महाडीक तर खंडाळा तालुक्‍यातील प्रदीप क्षीरसागर, अशोक धायगुडे, बबनराव शेळके, हर्षवर्धन शेळके-पाटील आणि केंजळ येथील जयप्रकाश जगताप यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे उपरणे, दिशादर्शक दिवा व पुष्पगुच्छ देवून सर्वांचे स्वागत केले. 

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ताकदीने आणि विश्‍वासाने काम केले आहे, ज्या धडाडीने निर्णय घेतले. त्यामुळे तमाम जनतेत हेच सरकार पुन्हा सत्तेत येणार हा विश्‍वास निर्माण झाला आहे. ज्यांना जनतेची नाडी कळते ते सर्वजण भाजपात येत आहेत. त्याची प्रक्रिया वाई विधानसभा मतदारसंघातही सुरू झाली आहे. वाई, खंडाळा व महाबळेश्‍वरमधील अजूनही अनेकजण आपल्या संपर्कात आहेत. त्यांचाही लवकरच प्रवेश होईल. मदन भोसले यांच्या पाठिशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संपूर्ण सरकार ठामपणे उभे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले काम समाधानकारक आहे. त्यामुळे मदन भोसले विधिमंडळाच्या सभागृहात दिसणारच हा शब्द मी तुम्हाला देतो. आम्ही कोणाला भिती दाखवून पक्षात आणलेले नाही, तर लोक स्वत:हून येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मदन भोसले म्हणाले, वाई, खंडाळा आणि महाबळेश्‍वर तालुक्‍यासह ज्या ज्या ठिकाणचे प्रश्‍न मांडले. ते गतीने सोडविण्यास सरकारने सहकार्य केले आहे. एवढ्या ताकदीने आणि तडफेने काम करणारे सरकार असेल तर जनतेला दिलासा आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बळ मिळत आहे. अनेक महत्वपूर्ण तसेच वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्‍न सोडविण्याची किमया या सरकारने दाखवली आहे. हेच सरकार आणखी दहा वर्ष सत्तेवर राहिल्यास प्रश्‍नच शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळेच भाजपात येऊ इच्छिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्याचा ट्रेलर आज झाला असून लवकरच इतरही अनेकजण भाजपात दाखल होतील. 

दरम्यान, भाजपा वाई तालुका उद्योग आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दत्ता ढेकाणे यांचा सत्कार चंद्रकांत पाटील यांनी केला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अनिल जाधव, यशवंत लेले, तानाजीराव भिलारे, पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे, वाईचे नगरसेवक सतिश वैराट, निलेश महाडीक, उषाताई ओंबळे, यशराज भोसले, संतोष कवी, चेतन पार्टे, शेखर भिलारे, मधुकर बिरामणे, तीनही ताल्नुयातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मदन भोसले यांनी स्वागत केले. मजूर फेडरेशनचे संचालक सतिश भोसले यांनी आभार मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com