राज ठाकरे यांचे आरोप म्हणजे, युतीत भांडणे लावण्याचा प्रकार - चंद्रकांत खैरे

राज ठाकरे यांचे आरोप म्हणजे, युतीत भांडणे लावण्याचा प्रकार - चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : माझा पराभव कुणामुळे झाला, कसा झाला हे सगळ्यांना माहित आहे, त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेला आरोप म्हणजे शिवसेना-भाजपमध्ये भांडण लावण्याचा प्रकार असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सरकारनामाशी बोलतांना केली. मुंबईतील मेळाव्यात बोलतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव त्यांना मंत्री करावे लागू नये म्हणून शिवसेना-भाजपनेच ईव्हीएमच्या मदतीने केल्याचा आरोप केला होता. चंद्रकांत खैरे यांनी या आरोपाला प्रत्युत्तर देतांना सांगितले की, राज ठाकरे यांचा हा आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला हा प्रकार म्हणजे शिवसेना-भाजपमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न आहे. 

लोकसभा निवडणुकीत माझा पराभव कसा झाला, कुणी विरोधात काम केले, कुणाच्या उमेदवारीमुळे झाला हे सगळ्या जिल्ह्याला माहित आहे. राहिला प्रश्‍न केंद्रात मंत्री होण्याचा, तर याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे घेत असतात. माझ्या राजकीय जीवनात उध्दव ठाकरे यांनी मला भरभरून दिले आहे, भविष्यातही ते माझ्या बाबतीत योग्य विचार करतील. माझा पराभव शिवसेना-भाजपनेच केला हे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. उलट माझ्या पराभवाचे सगळ्यात जास्त दुःख कुणाला झाले असेल तर ते उध्दव ठाकरे यांना झाले. जालना येथील शेतकरी मेळाव्यात बोलतांना त्यांनी खैरे हा तुमचा नाही, तर माझा पराभव आहे अशा भावना जाहीरपणे व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे राज ठाकरे बोलले असले तरी त्यात तथ्य नाही. 

दगाबाजी सहन करणार नाही 
लोकसभा निवडणुकीत काय घडले याचा अनुभव पाठीशी आहे. परंतु तीच चूक किंवा दगाबाजी जर कुणी विधानसभा निवडणुकीत करण्याचा प्रयत्न केला, तर मात्र शिवसेना नेता म्हणून मी खपवून घेणार नाही. शिवसेना असो की भाजपचा उमेदवार या सगळ्यांनाच निवडूण आणण्याची जबादारी दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आहे. प्रामाणिकपणे काम करून युतीचे सर्वाधिक उमेदवार निवडूण आणू आणि महाराष्ट्रात भगवा फडकवू असा विश्‍वास देखील खैरे यांनी शेवटी व्यक्त केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com