chandrakant jadhav about man assembly seat | Sarkarnama

'माण'साठी उद्धव ठाकरे युती तोडतील; जिल्हाप्रमुखाचा दावा! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

चंद्रकांत जाधव यांच्या दाव्यानुसार माणची जागा शिवसेना सोडणार नाही. तर दुसऱ्या बाजूला शेखर गोरे यांचे बंधू जयकुमार गोरे हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आहेत. ती जागा भाजपला सुटून तिकीट मलाच मिळेल, असा जयकुमार यांचा दावा आहे. 

सातारा : माण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्यावतीने शेखर गोरे यांची उमेदवारी अंतिम असून याबद्दल कोणतीही तडजोड नाही. हा 'मातोश्री'वरुन आलेला आदेश आहे, असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला. 

कुळकजाई, ता.माण येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला  स्थानिक नेते शेखर गोरे, विजय पाटील, सुरेखाताई पाखले युवराज पाटील, बाळासाहेब मुलाणी, संतोष किवटे उपस्थित होते.

चंद्रकांत जाधव म्हणाले, 'मातोश्री'वरून जेव्हा एखादा आदेश निघतो तेव्हा तो आदेश हा अंतिम असतो. शेखर गोरे यांचे सामाजिक कार्य पाहून त्यांना पक्षात घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यांच्या आदेशानुसारच शेखर गोरे यांचा पक्षप्रवेश झाला आहे. पक्षप्रवेशावेळी माणमधून शेखर गोरे हे शिवसेनेचे उमेदवार असतील, ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. या एका जागेसाठी युती तोडायची वेळ आलीतर ते करू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे जाधव म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख