" मला पाडण्यासाठी पवारांच्या कोथरुडमध्ये रात्री बैठका '

 " मला पाडण्यासाठी पवारांच्या कोथरुडमध्ये रात्री बैठका '

पुणे : माझा कोथरूड मतदार संघातील विजय शरद पवार यांनी अवघड करून ठेवला होता. ते रातोरात माझ्या मतदार संघात बैठक घेत असत. बैठक झाल्यावर मला समजत होते त्यांनी बैठक घेतली आहे. मी जिथे असतो तिथे तुम्हाला शरद पवार सापडतील असे चंद्रकांत पाटील यांनी महापौर मुरली मोहोळ यांच्या सत्कार समारंभावेळी आवर्जून सांगितले. 

त्याचबरोबर मुरलीमुळे माझा विजय झाला. नाहीतर माझा विजय कठीण होऊन बसला होता. तो माझी उमेदवारी जाहीर झाल्यावर नाराज झाला होता पण देवेंद्रची भेट घेतल्यावर मुरलीने अहोरात्र काम करून माझा विजय मिळवला. ज्या वेळेला मी नवीन पिढीचा विचार करतो त्यावेळी आम्हाला समोर मुरलीधर मोहोळ याचे नाव दिसते त्याच्यामध्ये कर्तबगारी आहे, संयम आहे कष्ट करण्याची ताकद आहे. 

आजच कोथरूडच्या सांस्कृतिक केंद्रासाठी स्थायी समितीने 20 कोटी मंजूर केले आहेत. कोथरूड मध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत मला याची कल्पना नव्हती पण ज्यावेळी विधान सभेसाठी कोथरूड मतदारसंघात फिरलो त्यावेळी मला समजले. मला भविष्य खूप कळत, मुरलीला खूप मोठं भविष्य आहे.पुण्यातील नगरसेवक पैशाने मोठे झाले कामे तशीच राहिली आत्ता ते न होता आपले शहर व पक्ष वाढला पाहिजे. देवेन्द्र फडवणीस यांना दगा फटका नसता झाला तर त्यांनी वसंतराव नाईक यांचा रेकॉर्ड मोडला असता. 
कोथरूडमध्ये महापौर मुरलीधर मोहोळ यांचा नागरी सत्कार कोथरूडकारांच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांचा उपस्थिती मध्ये आयोजित करण्यात आला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com