Chandrakant dada dares Raj Thakray to tour with him | Sarkarnama

राज ठाकरेंना चंद्रकांतदादांचे आव्हान: माझ्यासोबत फिरा दौरे करा !

लुमाकांत नलवडे
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

चंद्रकांदादांनी  थेट राज ठाकरे यांनी आपल्यासोबत राज्याचा दौरा करण्याचे आव्हान दिले आहे.

कोल्हापूर : राज्यातील रस्ते आणि खड्डे यावर भाजपा सरकारवर टीका  होत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ही कार्टुनच्या माध्यमातून सरकारवर   टीका    करीत आहेत. 

या टीकेला  आज भाजपातील वजनदार आणि राज्यातील क्रमांक दोनचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिले . चंद्रकांदादांनी  थेट राज ठाकरे यांनी आपल्यासोबत राज्याचा दौरा करण्याचे आव्हान दिले आहे.

 कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री  पाटील म्हणाले," राज ठाकरे मोठे नेते आहेत. मी कॉलेजपासून त्यांचे कार्टुन पाहतो. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा माझ्या सोबत काही ठिकाणी दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी आम्ही केलेले काम पाहिले आहे. तेथील जाहीर भाषणात त्यांनी भाजपाच्या कामाचा गौरव केला आहे."

"काही ठिकाणी सर्वच कामे पूर्ण होण्यास मर्यादा येतात. हे त्यांनीही समजून घेतले आहे. आता राज ठाकरेंनीही माझ्या सोबत फिरावे, दौरे करावेत. त्यांनाही आम्ही केलेली कामे दाखवू ,"असे जाहीर करून मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी थेट राज ठाकरेंनाच आव्हानच दिले. आता राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्या आव्हान स्विकारणार का याकडे लक्ष लागले आहे. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख