निवडणुका जिंकून पुन्हा राज्य जिंकू : चंद्रकांतदादांचा कार्यकर्त्यांना बूस्टर डोस

..
निवडणुका जिंकून पुन्हा राज्य जिंकू : चंद्रकांतदादांचा कार्यकर्त्यांना बूस्टर डोस

रत्नागिरी : "जिथे निवडणूक तिथे भाजप' या ब्रीदवाक्‍यानुसार निवडणुका जिंकून पुन्हा राज्य जिंकू, असे सांगत नगराध्यक्ष पोटनिवडणुकीतील पराभवाने मनाला चटका लागला. पराभवातून खचून जाऊ नका, पुन्हा नव्याने कामाला लागा. निवडणुकीत हार-जीत होत असते. सरकार नसतानाही कामे करता येतात. कार्यकर्त्यांनी असाच उत्साह, जोश दाखवा. जिंकायची प्रेरणा जागृत करा, 2024 ला जिल्ह्यातील सर्व जागा जिंकू, असा विश्‍वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.

येथील जयेश मंगल पार्कमध्ये भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, 1980 पासून राज्यात कोणत्याही पक्षाला 100 पेक्षा अधिक जागा मिळाल्या नाहीत. भाजपने सलग दोनवेळा या जागा मिळवल्या. "किंगमेकर' म्हणणाऱ्या राष्ट्रवादीलाही एवढ्या जागा मिळवता आल्या नाहीत.

भाजप जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी चंद्रकांतदादांचा सत्कार केला. ऍड. पटवर्धन म्हणाले, श्री. पाटील यांनी आज वेळ दिल्याने कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. तुम्ही असेच पाठीशी उभे राहिलात तर नक्कीच कमळ फुलवू. व्यासपीठावर माजी आमदार बाळ माने, ऍड. विलास पाटणे, अशोक मयेकर, ऍड. बाबा परुळेकर, शहराध्यक्ष सचिन करमरकर, मुन्नाशेठ सुर्वे, राजश्री शिवलकर, ऐश्‍वर्या जठार, अंजली साळवी, पंचायत समिती सदस्य स्नेहा चव्हाण आदी उपस्थित होते. सचिन वहाळकर यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी दामोदर लोकरे, सुजाता साळवी, वैद्य भिडे, डॉ. सुभाष देव, नीलेश आखाडे, संगीता कवितके, माजी नगरसेविका ऍड. सुमिता भावे आदींनी मनोगत व्यक्त केले.

भाजप कमी नाही, हे सिद्ध..
ऍड. पटवर्धन म्हणाले की, भाजप कमी नाही, हे सिद्ध झाले. पायाला भिंगरी लावून कार्यकर्ते फिरत होते. प्रचारात कुठेही कमतरता नव्हती. हा विजय नक्की होता, पण थोडे कमी पडलो. गेल्या 35 वर्षांत मला प्रथमच निवडणूक लढवायला मिळाली, हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण वाटतो. जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न करू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com