पुण्याच्या पाणी पुरवठ्यावर चंद्रकांत पाटलांचा " अजितदादा स्टाईल ' तोडगा

 पुण्याच्या पाणी पुरवठ्यावर चंद्रकांत पाटलांचा " अजितदादा स्टाईल ' तोडगा

पुणे : धरणांमध्ये मुबलक पाणी असताना पुणेकरांवर पाणीकपात का लादता, असा "अजितदादा स्टाईल' जाब विचारत, देखभाल-दुरुस्तीसाठी शहराचे पाणी बंद करू नका, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सोमवारी बजावले. त्याचवेळी यापुढे देखभाल करा; पण दर गुरुवारी पाणीपुरवठा सुरूच ठेवण्याचा दमही चंद्रकांतदादांनी अधिकाऱ्यांना भरला. अधिकाऱ्यांनीही नव्या दादांचा शब्द पडू दिला नाही आणि लगेचच पुणेकरांचे पाणी सुरळीत राहणार असल्याचे जाहीर केले. 

दरम्यान, गुरुवारी (ता. 7) पाणीपुरवठा बंद राहील; मात्र त्यानंतरच्या गुरुवारपासून तो सुरळीत असेल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले. गरज नसतानाही गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवून पुणेकरांचे हाल केले जात असल्याची तक्रार नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी पाटील यांच्याकडे केली. 
शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे शंभर टक्के भरली आहेत. तरीही वडगाव जलकेंद्राअंतर्गत पाणीकपात सुरू आहे. जलकेंद्राची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार असल्याने गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे पुणेकरांचे हाल होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पाटील यांनी अगरवाल यांच्याशी चर्चा केली आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना केल्या. 

पुणेकरांना रोज ठरल्याप्रमाणे पाणी मिळाले पाहिजे. दुरुस्तीसाठी दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवू नये, अशी सूचना महापालिकेला केली आहे. त्यामुळे भविष्यात पुणेकरांना पुरेसे पाणी मिळेल. मात्र, पाण्याची बचत व्हावी, यासाठी देखभालीकडे काणाडोळा करू नका, असे पाटील यांनी सांगितले. चंद्रकांतदादांची नाराजी व्यक्त करणारे पत्र नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला देत, नियोजनाच्या नावाखालची पाणीकपात बंद करण्याची मागणी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com